Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > 'गोकुळ' देणार भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारकांना म्हैस खरेदीसाठी मिळणार विनातारण कर्ज

'गोकुळ' देणार भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारकांना म्हैस खरेदीसाठी मिळणार विनातारण कर्ज

'Gokul' will be given to landless agricultural laborers, small landholders will get collateral-free loans to purchase buffaloes | 'गोकुळ' देणार भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारकांना म्हैस खरेदीसाठी मिळणार विनातारण कर्ज

'गोकुळ' देणार भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारकांना म्हैस खरेदीसाठी मिळणार विनातारण कर्ज

म्हैस दुधाला मुंबईसह सर्वच बाजारपेठेत मोठी मागणी आहे पण दूध कमी पडत आहे. आगामी काळात म्हैस दूध संकलनात वाढ करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक दूध उत्पादकांना विनातारण कर्ज देऊ अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

म्हैस दुधाला मुंबईसह सर्वच बाजारपेठेत मोठी मागणी आहे पण दूध कमी पडत आहे. आगामी काळात म्हैस दूध संकलनात वाढ करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक दूध उत्पादकांना विनातारण कर्ज देऊ अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

शेअर :

Join us
Join usNext

'गोकुळ'च्या म्हैस दुधाला मुंबईसह सर्वच बाजारपेठेत मोठी मागणी आहे; पण दूध कमी पडत आहे. आगामी काळात म्हैस दूध संकलनात वाढ करण्यासाठी कर्नाटकसह सांगली, सातारा येथील दूध घ्या. त्याचबरोबर जिल्हा बँकेच्यावतीने भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक दूध उत्पादकांना विनातारण कर्ज देऊ, मात्र त्याच्या परतफेडीची जबाबदारी 'गोकुळ'ने घेतली पाहिजे, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

'गोकुळ'च्या वतीने म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमातंर्गत शनिवारी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. संघाकडून चारशेहून अधिक संस्था पशुखाद्य खरेदी करत नाहीत, याला पशुखाद्याचा दर्जा की सचिवांचे कमिशन कारणीभूत आहेत हे पाहा. छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर त्याची विश्वासार्हता जात असते, अशा शब्दात मंत्री मुश्रीफ यांनी संचालकांचे कान टोचले.

'गोकुळ'चे अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत २०५६ जातिवंत म्हशी आल्या आहेत. आगामी काळात एक हजार म्हशी केले तर त्याची आणायच्या आहेत. दरम्यान रणजितसिंह पाटील यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी योजनांची माहिती दिली.

'लाडका सुपरवायझर' अन् लाखाचे बक्षीस

शंभर म्हशी खरेदीचे टार्गेट पूर्ण करणाऱ्या सुपरवायझरना 'लाडका सुपरवायझर' म्हणून गौरवण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यातून तीन क्रमांक काढून त्यांना एक लाखाचे बक्षीस देणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

दोन महिन्यांनंतर आमच्यासाठी काम करा

डिसेंबर पोटी १.२५ पैसे कपात केले आहेत. याबाबत संस्थेत जाऊन उत्पादकांना समजावून सांगा, असे सुपरवायझर यांना आवाहन करत ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, दोन महिने म्हैस दूध वाढीसाठी काम करा, त्यानंतर आमच्यासाठी करायचे आहे.

हेही वाचा : दूध उत्पादन वाढविणारे कृषी अवशेषांपासून पोषक आणि पाचक पशुखाद्य विकसित; डॉ. पंदेकृविचे नवे तंत्र

Web Title: 'Gokul' will be given to landless agricultural laborers, small landholders will get collateral-free loans to purchase buffaloes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.