Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dudh Dar : राज्यातील इतर संघांकडून रुपयाची वाढ मात्र 'गोकुळ', 'वारणा'च्या दूध खरेदी दरात वाढ नाही

Dudh Dar : राज्यातील इतर संघांकडून रुपयाची वाढ मात्र 'गोकुळ', 'वारणा'च्या दूध खरेदी दरात वाढ नाही

Dudh Dar: Rupee increase from other unions in the state but no increase in milk purchase price of 'Gokul', 'Warana' | Dudh Dar : राज्यातील इतर संघांकडून रुपयाची वाढ मात्र 'गोकुळ', 'वारणा'च्या दूध खरेदी दरात वाढ नाही

Dudh Dar : राज्यातील इतर संघांकडून रुपयाची वाढ मात्र 'गोकुळ', 'वारणा'च्या दूध खरेदी दरात वाढ नाही

Milk Rate OF Gokul Varana Rajarambapu Dudh Sangh : दूध पावडर व बटरचे देशांतर्गत बाजारपेठेत दर थोडे वधारल्याने राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर रुपयांची वाढ केली आहे. हे दूध संघ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर तीस रुपये दर देणार आहेत.

Milk Rate OF Gokul Varana Rajarambapu Dudh Sangh : दूध पावडर व बटरचे देशांतर्गत बाजारपेठेत दर थोडे वधारल्याने राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर रुपयांची वाढ केली आहे. हे दूध संघ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर तीस रुपये दर देणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

दूध पावडर व बटरचे देशांतर्गत बाजारपेठेत दर थोडे वधारल्याने राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर रुपयांची वाढ केली आहे. हे दूध संघ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर तीस रुपये दर देणार आहेत.

मात्र 'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू' या दूध संघांचा दर तीस रुपये असल्याने त्यांनी खरेदी दर जैसे थे ठेवले आहेत.

गाय दूध अतिरिक्त झाल्याने राज्यातील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात कपात केली होती. मध्यंतरी सर्वच दूध संघांनी प्रतिलिटर तीन रुपयांनी दर कमी केले होते.

'गोकुळ', 'वारणा', 'राजारामबापू', दूध संघ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी तीस रुपये, तर इतर दूध संघांनी २८ ते २९ रुपये दर केला होता. शासनानेही १ डिसेंबरपासून गाय दूध अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.

दूध संघांनी दरात वाढ करावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यात, गेल्या महिन्याभरापासून देशातंर्गत बाजारपेठेत दूध पावडर व बटरच्या दरात थोडीसी वाढ झाल्याने संघांनी खरेदी दरात वाढ करायचा निर्णय घेतला आहे.

प्रतिलिटर तीस रुपये दराने दूध खरेदी केले जाणार आहे. मात्र, 'गोकुळ', 'वारणा' व 'राजारामबापू' दूध संघ अगोदरच तीस रुपये दर देत असल्याने त्यांनी दरवाढ केलेली नाही. 

देशांतंर्गत बाजारपेठेत दर प्रतिकिलो

 पावडरबटर
महिन्यापूर्वीचा दर२१५ ३८५ 
सध्याचा दर२२५ ३९५ 

फेब्रुवारीनंतर खरेदी दरात वाढ शक्य

• फेब्रुवारी महिन्यात दुधाबरोबरच पावडर व बटरची मागणी वाढते. परिणामी दूध खरेदी दरात वाढ होते.

• गेल्या वर्षभरापासून दूध उत्पादकांची घालमेल सुरू आहे. येत्या महिन्याभरात दरात वाढ अपेक्षित आहे.

हेही वाचा : Dairy Farmer Success Story : शेतीला पशुधनाची जोड गरजेची; दूध दर कमी असतांनाही देविदासरावांची आर्थिक प्रगती

Web Title: Dudh Dar: Rupee increase from other unions in the state but no increase in milk purchase price of 'Gokul', 'Warana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.