मोडनिंब : यंदा पाऊस जास्त काळ राहिला आणि चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जनावरांचे बाजार तेजीत आहेत.
त्यामुळे मोडनिंब येथील जनावरांच्या आठवडा बाजारात संकरित गायी व म्हशीचे दर उन्हाळ्यामुळे स्थिरावले असून संकरित गायी १ लाखापासून ८० हजार रुपयांवर विक्री केली जात आहे.
उन्हाळा म्हटले की, आठवडा बाजारात शेतकरी चाऱ्याअभावी जनावरे विक्रीसाठी घेऊन येतात. किंमत कितीही मिळो; ती विकून मोकळे होतात.
कारण त्यांना चारा उपलब्ध होत नव्हता. मात्र पुरेसा चारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा जनावरांच्या दरात म्हणावी अशी वाढ झालेली दिसत नाही. बाजारात जनावरे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
लाखात जनावरे
◼️ यंदा संकरित गायीचे दर ८० हजारपासून १ लाखापर्यंत आहेत.
◼️ तर म्हशींचे दरही ५० हजार रुपयांपासून ८० हजार रुपये पर्यंत आहेत.
◼️ ज्या शेतकऱ्यांना गायी अथवा म्हशी विकत घ्यायच्या आहेत ते आठवडा बाजारात येऊन खरेदी करताहेत.
उन्हाच्या झळा जाणवू नये म्हणून मंडपाची सावली
◼️ वाढत्या उन्हाचा परिणाम आठवडा बाजारावरील दिसत असून दुपारी २ वाजता जनावरांचा बाजार पूर्णपणे संपुष्टात येतो.
◼️ अनेक व्यापाऱ्यांनी जनावरांना वाढत्या उन्हाच्या झळा जाणवू नये म्हणून बाजारात तात्पुरते सावलीचे मंडप उभे करताहेत.
◼️ यंदा मुबलक पाऊस झाल्याने शेतकऱ्याकडे हिरवा चारा उपलब्ध होतोय.
◼️ बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा जनावरे न विकता दावणीत ठेवली आहेत.
◼️ मात्र ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आहेत किंवा दारातील जनावरांची संख्या जास्त झाली आहे असे शेतकरी विक्रीसाठी आठवडा बाजारात जनावर घेऊन येताहेत.
अधिक वाचा: बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर?
