Lok Sabha Election 2019 : मंगरुळपीर येथील दोन केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 02:51 PM2019-04-11T14:51:51+5:302019-04-11T15:14:50+5:30

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर येथील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिघाड झाला आहे.

lok sabha elections 2019 Failure of EVM at two centers in Mangrulpir washim | Lok Sabha Election 2019 : मंगरुळपीर येथील दोन केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड

Lok Sabha Election 2019 : मंगरुळपीर येथील दोन केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड

Next
ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर येथील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिघाड झाला आहे.  तासाभरानंतर येथे पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. मंगरुळपीर शहरातील मतदान कक्ष क्रमांक ७८ आणि मतदान कक्ष क्रमांक २३ मधील ईव्हीएम मशीन प्रक्रियेदरम्यानच बंद पडल्या.

वाशिम - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर येथील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिघाड झाला आहे. त्यामुळे या केंद्रावरील मतदारांना उन्हात ताटकळत बसावे लागले. जवळपास तासाभरानंतर येथे पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली. यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. या मतदारसंघातील वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या मंगरुळपीर शहरातील मतदान कक्ष क्रमांक ७८ आणि मतदान कक्ष क्रमांक २३ मधील ईव्हीएम मशीन प्रक्रियेदरम्यानच बंद पडल्या. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसह मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाळा. तासभर उन्हात मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. अखेर या ठिकाणी पर्यायी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने मतदारांना दिलासा मिळाला.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. 

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

Web Title: lok sabha elections 2019 Failure of EVM at two centers in Mangrulpir washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.