पडद्यावरील रामाला खऱ्या रावणाच्या सासरी आव्हान; भाजपची नवीन खेळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 07:25 AM2024-04-20T07:25:42+5:302024-04-20T07:26:23+5:30

भारतीय जनता पक्षाने मेरठमध्ये तीन वेळचे खासदार राजेंद्र अगरवाल यांना बाजूला बसविण्याचा डाव खेळला आहे.

On-screen Rama is challenged by the real Ravana's mother-in-law | पडद्यावरील रामाला खऱ्या रावणाच्या सासरी आव्हान; भाजपची नवीन खेळी!

पडद्यावरील रामाला खऱ्या रावणाच्या सासरी आव्हान; भाजपची नवीन खेळी!

ललित झांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क
मेरठ
: भारतीय जनता पक्षाने मेरठमध्ये तीन वेळचे खासदार राजेंद्र अगरवाल यांना बाजूला बसविण्याचा डाव खेळला आहे. त्याचवेळी भाजपने छोट्या पडद्यावरील ‘राम’ अर्थात अरुण गोविल यांच्यावर बाजी लावली आहे. रावणाच्या सासूरवाडीत प्रभू श्रीराम उमेदवार असे हे मनोरंजक चित्र आहे. समाजवादी पार्टीच्या सुनीता वर्मा प्रधान व बहुजन समाज पार्टीचे देवव्रत त्यागी हे प्रमुख विरोधी उमेदवार आता या कलावंत रामाला कशी लढत देतात, याची देशभर उत्सुकता आहे. 

समाजवादी पार्टीने भानुप्रताप सिंग व आमदार अतुल प्रधान असे दोन उमेदवार बदलून मेरठच्या माजी महापौर सुनीता वर्मा प्रधान यांना उमेदवारी दिली. शेवटच्या क्षणाचा हा बदल अतुल प्रधान यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारला. तर बसपाचे देवव्रत त्यागी यांचा मागास व मुस्लिमांच्या मतांवर जाेर आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • साक्षात राम आमच्याकडे मत मागण्यासाठी आले आहेत. त्यांना आम्ही निराश कसे करू शकतो, या भावनिक मुद्याला भाजपने हात घातला आहे. 
  • गेल्यावेळी भाजपचा उमेदवार येथून फक्त ४ हजार मतांच्या फरकाने जिंकून आला होता. गेल्यावेळी बसपा आणि सपा यांच्यासह राष्ट्रीय लोकदल सोबत होते. यावेळी बसपा व सपा दोघेही स्वतंत्र लढत आहेत मतविभाजनाचा भाजपला फायदा हाेऊ शकताे. तसेच यावेळी लोकदल भाजपसोबत आहे. 

२०१९ मध्ये काय घडले ?
राजेंद्र अगरवाल भाजप (विजयी) ५,८६,१८४ 
हाजी मोहम्मद याकूब बसप ५,८१, ४५५

Web Title: On-screen Rama is challenged by the real Ravana's mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.