बसपाकडून ११ जागांवर उमेदवार जाहीर, वाराणसीमध्ये मोदींविरोधात मुस्लीम उमेदवार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:24 AM2024-04-16T11:24:18+5:302024-04-16T11:25:34+5:30

Lok Sabha Election 2024 : बसपाने वारणसीमध्ये अतहर जमाल लारी यांनी उमेदवारी दिली आहे तर जौनपूरमधून धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

BSP announces new list of 11 candidates; fields Athar Jamal against Prime Minster Narendra Modi in Varanasi | बसपाकडून ११ जागांवर उमेदवार जाहीर, वाराणसीमध्ये मोदींविरोधात मुस्लीम उमेदवार!

बसपाकडून ११ जागांवर उमेदवार जाहीर, वाराणसीमध्ये मोदींविरोधात मुस्लीम उमेदवार!

BSP Candidates List : लोकसभा निवडणुकीसाठी मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने (बसपा) उत्तर प्रदेशातील ११ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्याविरोधात बसपाने मुस्लीम उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. 

बसपाने वारणसीमध्ये अतहर जमाल लारी यांनी उमेदवारी दिली आहे तर जौनपूरमधून धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला सिंह यांना उमेदवारी दिली आहे. मैनपुरीमधील आपला उमेदवार पार्टीने बदलला आहे. मैनपुरीतून गुलशन शाक्य यांचे तिकीट बदलले आहे. त्यांच्या जागी शिवप्रसाद यादव यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. 

याचबरोबर, बदायूंमध्ये मुस्लिम खाँ, बरेलीमध्ये छोटे लाल गंगवार, सुलतानपूरमध्ये उदराज वर्मा, फर्रुखाबादमध्ये क्रांती पांडे, बांदामध्ये मयंक द्विवेदी, डुमरियागंजमध्ये ख्वाजा समसुद्दीन, बलियामध्ये लल्लन सिंह यादव, गाजीपूरमधून उमेश कुमार सिंह यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. बसपाच्या उमेदवारांची नावे जाहीर करून मायावतींनी एकप्रकारे समाजवादी पार्टीच्या अडचणीत वाढ केली आहे. तसेच बसपाने आता अतहर जमाल लारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून मुस्लिम चेहरा म्हणून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'यांच्या'विरोधात उतरवले उमेदवार!
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यांच्या पत्नी आणि मैनपुरीतील उमेदवार डिंपल यादव यांच्या विरोधात बसपाने आपला उमेदवार बदलला आहे. मैनपुरीतून गुलशन देव शाक्य यांचे तिकीट रद्द करून शिवप्रसाद यादव यांना मैदानात उतरवले आहे. बलिया येथून भाजपाचे उमेदवार लल्लन सिंह यादव आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांना तिकीट देण्यात आले आहे. गाझीपूरमधून डॉ. उमेश कुमार सिंग यांना समाजवादी पार्चीचे उमेदवार अफजल अन्सारी आणि भाजपाचे पारसनाथ राय यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे. 

ख्वाजा शमसुद्दीन यांना डुमरियागंजमधून भाजपाचे उमेदवार जगदंबिका पाल यांच्या विरोधात तिकीट देण्यात आले आहे. उदराज वर्मा हे बसपाच्या तिकीटावर सुलतानपूरमधून भाजपा खासदार मनेका गांधी यांना आव्हान देणार आहेत. बदायूंमधून शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्य यादव यांच्या विरोधात मुस्लिम खान अशी बाजी लावली आहे, तर येथे भाजपाने दुर्विजय सिंह शाक्य यांना तिकीट दिले आहे.

Web Title: BSP announces new list of 11 candidates; fields Athar Jamal against Prime Minster Narendra Modi in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.