आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रईस शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

By नितीन पंडित | Published: April 20, 2024 05:44 PM2024-04-20T17:44:12+5:302024-04-20T17:50:07+5:30

भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनीन आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला होता.

rais sheikh reaction after resigning from mla in bhiwandi | आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रईस शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रईस शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

नितीन पंडित, भिवंडी: लोकसभा निवडणुकीचे राजकारण तापलेला असतानाच भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आपल्या आमदार पदाचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावर आमदार रईस शेख यांनी अखेर मौन सोडलं आहे.

आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया-

समाजवादी पक्षाचा राज्यात विस्तार करण्यासंदर्भात माझी काही भूमिका आहे. गेले वर्षभर मी त्यासंदर्भातले मुद्दे राज्य नेतृत्वाकडे मांडतो आहे. त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

माझी समाजवादी पक्षावरील निष्ठा कायम आहे. पक्षाने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.  मी पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि सदैव राहीन.  मी आमदार नसलो तरी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार वाढवण्याची माझी बांधिलकी कायम आहे.

मी उपस्थिती केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आजमी यांच्याकडे दिला आहे. मला आशा आहे की राज्यातील पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचा उचित निर्णय घेईल.

Web Title: rais sheikh reaction after resigning from mla in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.