नाईकांच्या बालेकिल्ल्यात संभाव्य उमेदवारीचे बॅनर, महायुतीत ठाणे लाेकसभा मिळणार कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 09:03 AM2024-01-30T09:03:41+5:302024-01-30T09:06:29+5:30

Thane Lok Sabha Constituency: लोकसभा कुणी लढवायची, यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला कलगीतुरा रंगत आहे. भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेने या मतदारसंघावरील दावा पक्का केला.

Banner of possible candidacy in Ganesh Naik's fortress, who will get Thane Loksabha in Mahayutti? | नाईकांच्या बालेकिल्ल्यात संभाव्य उमेदवारीचे बॅनर, महायुतीत ठाणे लाेकसभा मिळणार कुणाला?

नाईकांच्या बालेकिल्ल्यात संभाव्य उमेदवारीचे बॅनर, महायुतीत ठाणे लाेकसभा मिळणार कुणाला?

ठाणे  - लोकसभा कुणी लढवायची, यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला कलगीतुरा रंगत आहे. भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेने या मतदारसंघावरील दावा पक्का केला. शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांच्याकडून ठाण्यात नव्हे तर नवी मुंबईतही बॅनरबाजी करण्यात आली. ठाणे लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या पारड्यात पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भाजप हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी अनेकांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 

माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राम मंदिर उद्घाटनानिमित्ताने तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता. शिवसेनेकडून मांसुदा तलावाच्या ठिकाणी महाआरती आयोजित केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर स्वच्छतेचे आवाहन करताच त्याची सुरुवात शिवसेनेने ठाण्यात प्रथम करण्यात आली.

कोणाची वर्णी लागणार
आता नरेश म्हस्के यांच्या समर्थकांनी केवळ ठाण्यातच नव्हे तर नवी मुंबईतही बॅनरबाजी करून लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक संजीव नाईक यांच्यासह नाईक कुटुंबाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे आणि संजीव नाईक यांच्या नावांची लोकसभेकरिता चर्चा आहे.
सेनेकडून आमदार प्रताप सरनाईक आणि नरेश 
म्हस्के यांची नावे आघाडीवर आहेत. यात कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Banner of possible candidacy in Ganesh Naik's fortress, who will get Thane Loksabha in Mahayutti?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.