​उपेंद्र लिमयेचा हात कशामुळे भाजला?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2016 12:05 PM2016-11-14T12:05:40+5:302016-11-14T12:05:40+5:30

नकुशी...तरीही हवीहवीशी या मालिकेत सध्या उपेंद्र लिमये झळकत आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बेधुंद मनाच्या लहरी या मालिकेत काम ...

What is the reason for Upendra Limaye's hand? | ​उपेंद्र लिमयेचा हात कशामुळे भाजला?

​उपेंद्र लिमयेचा हात कशामुळे भाजला?

googlenewsNext
ुशी...तरीही हवीहवीशी या मालिकेत सध्या उपेंद्र लिमये झळकत आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बेधुंद मनाच्या लहरी या मालिकेत काम केले होते. पण चित्रपट आणि नाटकांमध्ये व्यग्र झाल्यानंतर उपेंद्र छोट्या पडद्यापासून दूर राहिला. पण आता जवळजवळ साडे आठ वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर या मालिकेद्वारे परतला आहे. या मालिकेच्या सेटवर त्याचा हात नुकताच भाजला.
या मालिकेत नकुशीची भूमिका साकारणारी प्रसिद्धी आयलवार रणजीत ही भूमिका साकारणाऱ्या उपेंद्रला सकाळी चहा देते असे दृश्य चित्रीत करत असताना हा अपघात घडला. या प्रसंगात दाखवला जाणारा चहा गरम आहे हे प्रेक्षकांना कळावे यासाठी चहातून वाफ येत असेल असाच चहा घ्यावा असे कॅमेऱ्यामॅनचे म्हणणे होते. त्यामुळे अतिशय गरम चहाचा कप प्रसिद्धीच्या हातात देऊन चित्रीकरण सुरू होते. पण चित्रीकरणाच्यावेळी व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार उपेंद्रने तिला लुक दिला. या लुकमुळे प्रसिद्धी इतकी घाबरली की तिच्या हातून गरम चहा उपेंद्रच्या हातावर सांडला. चहा खूप गरम असल्याने उपेंद्रचा हात चांगलाच भाजला. यामुळे उपेंद्र चिडेल असे सगळ्यांनाच वाटत होते. पण उपेंद्रने कोणतीही चिडचिड केली नाही. उलट त्याने हसत प्रसिद्धीकडे पाहिले. त्यामुळे प्रसिद्धीला आलेले टेन्शन क्षणात दूर झाले. उपेंद्र हा प्रसिद्धीपेक्षा खूपच सिनियर अभिनेता असल्याने तो यावर कसा रिअॅक्ट होतो हा तिला प्रश्न पडला होता. पण या अपघाताबद्दल काहीही विचार न करता चित्रीकरण चांगल्यारितीने करण्यासाठी त्यानेच तिला प्रोत्साहन दिले. 


Web Title: What is the reason for Upendra Limaye's hand?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.