Video: This is sad in the life of a skilled man, sharing videos on social media, emptying the emotions. | Video:कुशल बद्रिकेच्या आयुष्यात हे आहे दुःख,सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन भावनांना मोकळी करुन दिली वाट

कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील कॉमेडीयन रसिकांचं मनोरंजन करत आहेत.या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारे, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारी कॉमेडीअन्सची जोडी म्हणजे अभिनेता भाऊ कदम आणि अभिनेता कुशल बद्रिके. हे दोन्ही कलाकार रसिकांना विविध स्कीट्सच्या माध्यमातून मनोरंजन करतात.या दोघांचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना काय भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे दोघंही रसिकांना खळखळून हसवतात. 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोमधून हे कलाकार स्वतःवरही तितक्याच खिलाडू वृत्तीने विनोद करतात. भाऊ आणि कुशल सोशल मीडियावरही तितकेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधत असतात.सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण ते रसिकांसह शेअर करतात. नुकतंच कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कुशल आणि भाऊ स्वतःच्या पत्नीविषयी तसंच जेवणाविषयी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांची जेवणाची आवड आणि पत्नी काय जेवण करते असा संवाद या दोघांमध्ये रंगल्याचं दिसतंय. या व्हिडीओसह कुशलने एक पोस्टही टाकली आहे. “बायकोच्या मिठीत आयुष्य काढण्याची स्वप्नं बघता बघता आपण कधी तिच्या मुठीत जातो कळतं नाही. अनुभवाने सांगतो खूप हसवणाऱ्या माणसाच्या आयुष्यात खूप दुःख दडलेले असतं” अशी पोस्टही कुशलने या व्हिडीओसह शेअर केली आहे. चला तर मग तुम्हीही जाणून घ्या काय आहे कुशलच्या मनातलं दुःख.cnxoldfiles/a>रसिकांचीसिकांची हीच इच्छा पूर्ण केलीय याच विनोदवीरांपैकी एक असलेल्या अभिनेता कुशल बद्रिकेने. रसिकांना हसून हसून लोटपोट करणा-या कलाकारांची घरी काय अवस्था असते हे दाखवणारे फोटो कुशल बद्रिकेने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहेत.
Web Title: Video: This is sad in the life of a skilled man, sharing videos on social media, emptying the emotions.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.