या गोष्टीमुळे बाजी मालिकेतील हिराचा वाढला आत्मविश्वास !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 03:13 PM2018-09-26T15:13:37+5:302018-09-26T15:18:54+5:30

छोट्या पडद्यावर 'बाजी' ही मालिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. 'बाजी' या मालिकेच्या कथानकात लोहा हिराला ओलीस ठेवून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असतो.

This thing boosted the confidence of the hero in the series! | या गोष्टीमुळे बाजी मालिकेतील हिराचा वाढला आत्मविश्वास !

या गोष्टीमुळे बाजी मालिकेतील हिराचा वाढला आत्मविश्वास !

googlenewsNext

छोट्या पडद्यावर 'बाजी' ही मालिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. 'बाजी' या मालिकेच्या कथानकात लोहा हिराला ओलीस ठेवून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा तो हिराच्या गळ्याला विळी लावून तिला जेरबंद करतो आणि दरवाज्याकडे घेऊन जाण्यास सांगतो.या झटापटीत हिराला गळ्याला दुखापत झाली.भोर येथील वाडयात या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. तातडीने तिच्यावर उपचारही झाले.

या घटनेविषयी हिराची भूमिका करणारी नुपूर दैठणकर म्हणते की मुळात हिरा तलवार चालवते,दांडपट्टा चालवते. ही भूमिका एका धाडसी मुलीची आहे.त्यामुळे घोडेस्वारी पासून ते पहिल्या मजल्यावरून खाली उतरण्या पर्यंत सगळे स्टंटस मी केले.या शॉट च्या वेळेसही हातातली विळीअजिबात धारदार नव्हती,वरून आमच्या फाईटच्या टीम नं त्याला ट्रांस्परंट प्लास्टिकही चिटकवला होतं.पण तरीही  झटापटीत ही दुखापत झाली.पण आमचे दिग्दर्शक संतोष कोल्हे सर आणि  माझी सगळी टीम क्षणात धावून आली.लगेच प्राथमिक उपचार झाले.आणि उलट या यानंतर माझा स्टंट करतानाचा आत्मविश्वास दुपटीने वाढला".

लोहाचा मृत्यू हा बाजींच्या कथानकातला एक महत्वाचा टप्पा आहे.असेही नुपूर दैठणकर हिने सांगितले.या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं असून झी मराठीवर ही मलिका सोमवार ते शनिवार रोज रात्री साडेदहा वाजता प्रसारीत होते.

या मालिकेचं चित्रीकरण पुणे, भोर, सातारा आणि सासवड येथे झालं आहे. ही मालिका प्रामुख्याने पेशवाईच्या उत्तरार्धावर आधारित आहे. यात १७७० मधील अनेक खऱ्या गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. त्यामध्ये बिनीवाले, कोतवाल, कात्रजचा विष प्रयोग, गोदामाला आग, गणपतीच्या हाराची चोरी आदींचा समावेश आहे. यामध्ये शेराचं पात्र प्रखरसिंग तर बाजीचं पात्र अभिजित श्वेताचंद्र साकारणार आहे. संतोष कोल्हे यांनी या मालिकेसाठी खूप कष्ट घेतल्याचे नुपूरने सांगितले. नुपूर म्हणाली, "ही काल्पनिक कथा आहे. यात बाजी व हिराची प्रेमकथा दाखवली आहे. यातील प्रत्येक पात्राला वेगवेगळे कंगोरे आहेत. यात मी लावण्यवती, धाडसी, जिद्दी स्वराज्याच रक्षण करण्यास मागेपुढे न पाहणारी आणि घोडेस्वारी व तलवारबाजी करणारी दाखवली आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे."
 

Web Title: This thing boosted the confidence of the hero in the series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Baji Serialबाजी