In 'Tenali Rama', Ram will take a test of his own capacity | 'तेनाली रामा'मध्‍ये रामा घेणार स्वत:च्या क्षमतेची परीक्षा
'तेनाली रामा'मध्‍ये रामा घेणार स्वत:च्या क्षमतेची परीक्षा

ठळक मुद्देप्राचीन कथेवर आधारित विनोदी मालिका 'तेनाली रामा' रामा देणार आपल्या पदाचा राजीनामा


सोनी सबवरील प्राचीन कथेवर आधारित असलेली विनोदी मालिका 'तेनाली रामा' आपल्‍या लक्षवेधक कथांसह प्रेक्षकांची मने जिंकत आहे. रामा (कृष्‍णा भारद्वाज) साम्राज्‍यामध्‍ये आपला दर्जा अधिक सुधारण्‍याचा प्रयत्‍न करत असताना अखेर तो सम्राटाचा सल्‍लागार अष्‍टडीगजच्‍या पातळीपर्यंत पोहोचतो. पण आगामी भागात त्‍याला त्‍याच्‍या स्‍वत:च्‍या क्षमतांचीच परीक्षा घ्‍यावी लागणार आहे.


अखेर रामाने अष्‍टडीगजच्‍या एलिट समूहामध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर तथाचार्य (पंकज बेरी) तपस्‍या करण्‍यासाठी दूर जातो. तेथे तो एका अत्‍यंत हुशार मुलगा महेश दासला भेटतो. बिरबल (भावेश बालचंदानी) म्‍हणून ओळखला जाणारा हा मुलगा त्‍याची हुशारी व बुद्धीसह तथाचार्यला प्रभावित करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतो. रामासोबत स्‍पर्धा करण्‍यासाठी तथाचार्य त्‍या मुलाला विजयनगरमध्‍ये घेऊन येतो. दरबारामध्‍ये एका रिकाम्‍या पत्राचे प्रकरण येते आणि रामा व बिरबल हे दोघेही या प्रकरणाचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करतात. पण बिरबल रामावर मात करत पत्रातील सांकेतिक मजकूर ओळखतो. त्‍यामध्‍ये विजय नगरवरील हल्‍ल्‍याबाबत बातमी असते आणि ते हल्‍लेखोरांना पराभूत करत साम्राज्‍याचे रक्षण करतात. बिरबल रामापेक्षा अधिक वरचढ ठरल्‍याने तथाचार्य रामाच्‍या बुद्धीबाबत प्रश्‍न निर्माण करतो. यामुळे रामाला काही कृत्‍यांमध्‍ये बिरबलासोबत स्‍पर्धा करावी लागते. अखेर रामाला समजते की, बिरबल त्‍याच्‍यापेक्षाही हुशार आहे आणि तो साम्राज्‍य सोडण्‍याचा आणि आपल्‍या पदाचा राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतो.
रामाची भूमिका साकारणारा कृष्‍णा भारद्वाज म्‍हणाला,' दरबाराला आपले महत्‍त्‍व पटवून देण्‍यासाठी रामाला त्‍याच्‍या पदामध्‍ये पदोन्‍नती मिळणे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे होते. पण अष्‍टडिगज पातळीपर्यंत पोहोचल्‍यानंतर आणि बिरबलच्‍या प्रवेशासह रामा साम्राज्‍यामध्‍ये त्‍याची दर्जा टिकवून ठेवण्‍याचा प्रयत्‍न करू लागतो. या सीक्‍वेन्‍ससाठी शूटिंग करताना आम्‍हाला या ऐतिहासिक पात्रांबाबत भरपूर काही समजले, जे आनंददायक आहे.'


Web Title: In 'Tenali Rama', Ram will take a test of his own capacity
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.