Indian Idol 10 च्या सेटवर काजोलने घेतला अजय देवगणसाठी उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 10:49 AM2018-10-04T10:49:16+5:302018-10-04T10:51:08+5:30

इंडियन आयडल 10 या भारताच्या सर्वात मोठ्या संगीत रिअॅलिटी शोमध्ये सुपरस्टार अजय देवगण आणि काजोल यांनी नुकतीच हजेरी लावली. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करायला त्यांना खूप मजा आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Kajol and Ajay Devgn have an ‘nice’ experience on Indian Idol 10 | Indian Idol 10 च्या सेटवर काजोलने घेतला अजय देवगणसाठी उखाणा

Indian Idol 10 च्या सेटवर काजोलने घेतला अजय देवगणसाठी उखाणा

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सध्या प्रेक्षकांना इंडियन आयडल या कार्यक्रमाचा दहावा सिझन पाहायला मिळत आहे. आजवरच्या सगळ्या सिझनप्रमाणे हा सिझन देखील हिट गेला असून या सिझनमधील स्पर्धकांच्या अद्भुत परफॉर्मन्सेसमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरेल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात कोणता ना कोणता सेलिब्रेटी स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी कार्यक्रमात हजर असतो. आता या कार्यक्रमात आपल्याला प्रेक्षकांची लाडली बॉलिवूडमधील एक रिअल लाइफ जोडी पाहायला मिळणार आहे.

इंडियन आयडल 10 या भारताच्या सर्वात मोठ्या संगीत रिअॅलिटी शोमध्ये सुपरस्टार अजय देवगण आणि काजोल यांनी नुकतीच हजेरी लावली. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करायला त्यांना खूप मजा आली असल्याचे त्यांनी सांगितले. इंडियन आयडलच्या ड्युएट विशेष भागात सर्वोत्तम नऊ स्पर्धकांनी विविध गाणी म्हणून प्रेक्षकांना आणि परीक्षकांना मोहित केले. काजोलने या कार्यक्रमात आपला मराठी ठसका दाखवला.

कुणाल पंडित आणि अवंती पटेल यांचा अप्रतिम परफॉर्मन्स पाहिल्यानंतर काजोलने त्या दोन्ही गायकांवर कौतुकाचा वर्षाव केला. अजय देवगण आणि परीक्षक देखील कुणाल आणि अवंती यांच्या सुंदर गायनाने प्रभावित झाले होते. आपल्या धमाल शैलीत काजोलने सांगितले की, तिने अजय देवगणसाठी कधीच उखाणा घेतला नाही आहे. अगदी त्यांच्या लग्नात देखील नाही. असे सांगून तिने उखाणा घेण्यासाठी ही संधी साधली. तिचा हा उखाणा उपस्थित सगळ्यांनाच खूप आवडला.

सेटवरील सूत्राने सांगितले की, “अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक मानले जाते. त्यांच्या केवळ उपस्थितीमुळे सर्व स्पर्धकांचे मनोधैर्य वाढले आणि त्या दोघांनी मनापासून सर्व गायकांचे कौतुक केले. काजोलने इंडियन आयडल 10 च्या सेटवर अजय देवगणसाठी मराठी संस्कृतीत घेतला जात असलेला पारंपरिक उखाणा घेतला. तो क्षण कार्यक्रमातील सगळ्यांसाठी खूप खास होता. यापूर्वी तिला असा उखाणा घेण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. त्यामुळे तिने देखील हा क्षण खूप एन्जॉ़य केला.”

Web Title: Kajol and Ajay Devgn have an ‘nice’ experience on Indian Idol 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.