देवाच्या पालखीने शोधली अवघ्या काही मिनिटांत खुणा, नेमकी काय आहे ही प्रथा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 02:10 PM2022-03-29T14:10:08+5:302022-03-29T14:10:41+5:30

ही खुणा काढून शिमगोत्सवाचे कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याचा एकप्रकारे दाखलाही दिला. खुणेची प्रथा पाहण्यासाठी शीळ तसेच राजापूर शहर, गोठणे-दोनिवडे, उन्हाळे व तालुका परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Signs discovered by God scaffolding in just a few minutes, The practice of marking in many places after Shimgotsava in Konkan | देवाच्या पालखीने शोधली अवघ्या काही मिनिटांत खुणा, नेमकी काय आहे ही प्रथा?

देवाच्या पालखीने शोधली अवघ्या काही मिनिटांत खुणा, नेमकी काय आहे ही प्रथा?

googlenewsNext

राजापूर : शहरानजीकच्या शीळ येथे रात्री गावकर मंडळींनी लपवून ठेवलेली ‘खुणा’ श्रीदेव ब्राह्मणदेवाच्या पालखीने अवघ्या काही मिनिटांत शोधून काढली. ही खुणा काढून शिमगोत्सवाचे कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याचा एकप्रकारे दाखलाही दिला. खुणा काढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती.

कोकणात शिमगोत्सवानंतर अनेक ठिकाणी खुणा घालण्याची प्रथा रूढ आहे. शिमगोत्सव निर्विघ्नपणे पार पडले की नाही याची ग्रामदेवतेकडूनच खातरजमा करून घेण्यासाठी खुणा घालण्यात येते. यासाठी खुणेच्या आदल्या रात्री ग्रामदेवतेचे मानकरी मंडळी गावातील एखादी सपाट जागा हेरून त्याठिकाणी खड्डा खोेदून त्यात नारळ आणि फुलं लपवितात.

मातीच्या रोखाने खुणेचा शोध

दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी त्याठिकाणी आणून ढोल-ताशाच्या गजरात नाचविली जाते. यावेळी खुणा ठेवणारे मानकरी खुणेच्या जागेवरची माती इतरत्र पसरवितात. त्यामुळे पालखी या मातीच्या रोखाने खुणेचा शोध घेते आणि लपवून ठेवलेली ही खुणा बिनचूक शोधून काढते.

अवघ्या २० मिनिटांत पालखीची खुणेच्या ठिकाणी बैठक

त्याप्रमाणे शीळ येथे शनिवारी शिंपणे आणि रोमटाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रविवारी सकाळी सतीचा मळा येथे श्री ब्राह्मणदेवाची पालखी खुणा लपविलेल्या ठिकाणी वाजत गाजत आणण्यात आली. गावकर मंडळींनी यथासांग गाऱ्हाणे घातल्यानंतर सकाळी नऊ वाजता खुणा काढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अवघ्या २० मिनिटांत पालखीने खुणेच्या ठिकाणी खूर मारत बैठक मारली आणि उपस्थित भाविकांनी श्रीदेव ब्राह्मणदेवाचा जयजयकार करत जल्लोष केला.

दर तीन वर्षांनी घातली जाते खुणा

गेल्या अनेक पिढ्या नागरेकर मंडळी ही प्रथा जपत आहेत. दर तीन वर्षांनी ही खुणा घालण्याची परंपरा असल्याची माहिती गावकर कृष्णा नागरेकर यांनी दिली. खुणेची प्रथा पाहण्यासाठी शीळ तसेच राजापूर शहर, गोठणे-दोनिवडे, उन्हाळे व तालुका परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Web Title: Signs discovered by God scaffolding in just a few minutes, The practice of marking in many places after Shimgotsava in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.