चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर; खासगी वाहतुकीची लुटमार थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:31 PM2020-08-28T23:31:37+5:302020-08-28T23:32:04+5:30

लालपरी सर्वसामान्यांच्या सेवेत: श्रीवर्धन आगार सज्ज

Shrivardhan Depot is ready to make the return journey of the servants pleasant | चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर; खासगी वाहतुकीची लुटमार थांबणार

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर; खासगी वाहतुकीची लुटमार थांबणार

Next

संतोष सापते

श्रीवर्धन : गौरी-गणपतीला गावी आलेल्या गणेशभक्ताच्या परतीच्या प्रवासासाठी श्रीवर्धन आगार सज्ज झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बहुसंख्य लोक कामधंदा व नोकरीनिमित्त बोरीवली, नालासोपारा, भांडुप, मुंबई आणि उपनगरामध्ये वास्तव्य करून आहेत. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त आलेल्या सर्व भाविकांना पुन्हा त्याच्या कामगिरीवर हजर होण्यासाठी श्रीवर्धन आगारातून आगामी पाच दिवस जवळपास सहा हजार किमीची जादा वाहतूक नियमित करण्यात येणार आहे.

जिल्हाबाह्य वाहतुकीला राज्य सरकारने मान्यता दिली असून, पुणे सकाळी ५, सातारा सकाळी ५.४५, नालासोपारा सकाळी ७, दुपारी १, बोरीवली सकाळी ८.३०, ११, मुंबई सकाळी ४, ५, ८, ११.४५, तसेच दिघीवरून सकाळी ४, रात्री ८ वाजता या नियमित फेऱ्या चालविण्यात येणार आहेत, तसेच ग्रामीण भागातील गावगाडा पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातून तोरडी वस्ती, माणगाव वस्ती, कुडा वस्ती, नानवेल वस्ती, दिघी वस्ती या रात्रवस्तीच्या बसेस सुरू केल्याचे आगार प्रमुख तेजस गायकवाड यांनी सांगितले. श्रीवर्धन आगारातील वाहतूक निरीक्षक शर्वरी लांजेकर, वाहतूक नियंत्रक दीपक जाधव, कार्यशाळा प्रमुख प्रदीप विचारे यांनी जादा वाहतुकीसाठी धोरणात्मक भूमिका घेत, जास्तीतजास्त प्रवासी वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातून बसेसचे वेळापत्रक तयार केले आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी बोर्लीपंचतन, म्हसळा, श्रीवर्धन या सर्व ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्षाची सुयोग्य मांडणी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्य सरकारच्या निर्देशानुसार २३ मार्चपासून श्रीवर्धन आगारातील प्रवाशी वाहतूक बंद होती. त्यावेळी अनधिकृत खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची लुटमार केली. बोर्ली ते आदगाव ४०० रुपये, तसेच बोर्ली ते सर्वा ६०० रु. प्रति फेरी प्रवास भाडे आकारले गेले. म्हसळा-मादाटने ६० रु. प्रती व्यक्ती. श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील कारविणे, गडबवाडी, कोलमांडला, तळवडे, कोन्दरी, पानवे, केल्टे, सांगवड, रुद्रावट, गाणी, कोलवट, भापट, रोहिणी, तुरबाडी, काळसुरी, वारळ, चिरगाव या सर्व आडमार्गावर एसटी बंद असल्याने, अनधिकृत खासगी वाहतूकदाराने आवाच्या सव्वा प्रवासभाडे आकारले.

जनतेला माफक दरात प्रवासी वाहतूक देण्यासाठी एसटी प्रशासन कटिबद्ध आहे. ज्या मार्गावर ती प्रवासी असतील, त्या मार्गाला प्राधान्यक्रम दिला जाईल. जनतेने सहकार्य करावे, ही विनंती. - तेजस गायकवाड, आगार प्रमुख, श्रीवर्धन

आमच्या तोराडी मार्गावरील एसटी वाहतूक बंद होती, त्यावेळेस दळणवळणाचा प्रचंड त्रास झाला. आमच्या मार्गावरील वाहतूक सुरू केल्याबद्दल एसटी प्रशासनाचे आभार. - जनाब कौचाली, रहिवासी पांगळोली

बोर्लीपंचतन वाहतूक नियंत्रण कक्षात मॅन्युअली तिकीटविक्री सुरू आहे. ग्रामीण भागात उत्तम सेवा देण्यासाठी एसटी सज्ज आहे.
- रवींद्र मोरे, वाहतूक नियंत्रक, बोर्लीपंचतन

मी नियमित आदगाव ते बोर्लीपंचतन प्रवास करतो. एसटी बंद होती, त्यावेळी मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा एसटी सुरू झालेली आहे. त्यामुळे आनंद झाला आहे. - गजानन विलनकर, रहिवासी आदगाव

Web Title: Shrivardhan Depot is ready to make the return journey of the servants pleasant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.