पूर्वीचा कुलाबा मतदार संघ करा ताकद दाखवतो, पंडित पाटील यांचे तटकरेंना आव्हान

By राजेश भोस्तेकर | Published: May 3, 2024 03:57 PM2024-05-03T15:57:03+5:302024-05-03T15:59:56+5:30

या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार असून पापाचे पैसे घेऊ नका असे आवाहन करीत ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या, त्याच्या जिलेबी लाडू पण खा मत मात्र अनंत गीते यांना टाका असेही पंडित पाटील यांनी भाषणातून म्हटले आहे.

Former Kolaba Constituency Shows Kara Strength, Pandit Patil's Challenge To Kara | पूर्वीचा कुलाबा मतदार संघ करा ताकद दाखवतो, पंडित पाटील यांचे तटकरेंना आव्हान

पूर्वीचा कुलाबा मतदार संघ करा ताकद दाखवतो, पंडित पाटील यांचे तटकरेंना आव्हान

अलिबाग : पूर्वीचा कुलाबा मतदार संघ पुन्हा करा जयंत पाटील यांना खासदारकी साठी उभे करून शेकापची काय ताकद आहे हे दाखवून देतो असे आव्हान शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना केले आहे. या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार असून पापाचे पैसे घेऊ नका असे आवाहन करीत ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या, त्याच्या जिलेबी लाडू पण खा मत मात्र अनंत गीते यांना टाका असेही पंडित पाटील यांनी भाषणातून म्हटले आहे. तर गेल्यावेळी केलेली चूक आम्हाला महागात पडली आहे. मात्र ती चूक आता सुधारली आहे. आता तुमची वेळ आहे निवडून आल्यानंतर आम्हाला टाटा करू नका असा मिश्किल टोलाही पंडित पाटील यांनी आघाडीला भाषणातून मारला आहे. 

इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सभा शुक्रवारी ३ मे रोजी मुरुड येथे झाली. या सभेत शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. अनंत गीते हे स्वच्छ चरित्र असलेले नेते असून त्यांना विजयी करा असे आवाहन मतदारांना केले आहे. मतदारांनी प्रलोबनाना बळी पडू नका असे आवाहन ही केले आहे. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही समोरच्या सोबत होते असे असूनही गीते यांना साडेचार लाख मते पडली होती. यावेळी गीते यांचा पराभव झाला आणि माझाही विधानसभेत पराभव झाला. मात्र लाभ तिसऱ्याचा झाला. त्यामुळे गीते ची जनमानसातील ताकद काय आहे हे मला कळले आहे. शेकाप लोकसभा लढवत नाही त्याचा पक्ष माचिस एवढा राहिला आहे या टीकेला उत्तर देताना पंडित पाटील यांनी तटकरे याना आव्हान दिले आहे. पूर्वीचा कुलाबा लोकसभा पुन्हा तयार करा, जयंत पाटील यांना खासदारकीला उभे करून शेकापची ताकद दाखवतो असे आव्हान तटकरे याना पंडित पाटील यांनी केले आहे. 

आताच्या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडत आहे. मतदारांनी प्रलोभनाला बळी पडू नका. समोरचे वाटप करीत असलेला पैसा हा पापाचा आहे, भ्रष्टाचाराचा आहे. त्यामुळे त्याचे पैसे घेऊ नका. तुम्हाला घ्यायचे असतील तर घ्या, जिलेबी लाडू ही खा पण मतदान हे अनंत गीते ना करा असे पंडित पाटील यांनी भाषणातून म्हटले आहे.

Web Title: Former Kolaba Constituency Shows Kara Strength, Pandit Patil's Challenge To Kara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.