पुण्यात २ हजार लिटर मद्य; ५९ लाख ९० हजार रुपये जप्त          

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:00 PM2019-04-05T17:00:35+5:302019-04-05T17:13:17+5:30

मतदारांना खुष करण्यासाठी जिल्ह्यातील मतदार संघात कमी अधिक प्रमाणात मद्याचा आणि पैशाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

2 thousand liters of alcohol and 59 lakhs 90 thousand rupees seized in pune | पुण्यात २ हजार लिटर मद्य; ५९ लाख ९० हजार रुपये जप्त          

पुण्यात २ हजार लिटर मद्य; ५९ लाख ९० हजार रुपये जप्त          

googlenewsNext
ठळक मुद्दे१० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत आचार संहिता भंग प्रकरणी ७० गुन्हे दाखलजिल्ह्यातील भरारी पथकाची कारवाई

 - राहुल शिंदे           
पुणे: लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून मतदारांना खुष करण्यासाठी जिल्ह्यातील चारही मतदार संघात कमी अधिक प्रमाणात मद्याचा आणि पैशाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.मात्र,जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांकडून अवैध मद्यसाठा आणि बेहिशोबी पैशावर कारवाई केली जात आहे. गेल्या पंचवीस दिवसात ५६ लाख ९० हजार ६३० रुपये तर ७ लाख १९ हजार ९०५ रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे.तसेच आचार संहिता भंग केल्या प्रकरणी ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली.निवडणूकांच्या काळात मतदारांना प्रलोभित करण्यासाठी मद्याचा आणि पैशाचा वापर केला जाऊ शकतो. तसेच शस्त्राचा धाक दाखवून ठराविक उमेदवाराला किंवा पक्षाला मतदान करण्यासाठी मतदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात मद्य, शस्त्र व पैशाचा चूकीच्या गोष्टीसाठी होणारा वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात दिवस रात्र विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर पैसे आणि मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचार संहितेचे पालन हावे,या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.मात्र,आचार संहिता भंग करणा-यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. १० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत आचार संहिता भंग प्रकरणी ७० गुन्हे दाखल झाले असून त्यात शिरूर मतदार संघात सर्वाधिक ५६ मावळमध्ये १ पुण्यात ५ तर बारामतीत १ गुन्हा दाखल झाला आहे.त्याचप्रमाणे शिवाजीनगर व वडगावशेरी येथे विना परवाना सभा घेतल्याबद्दल प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
आचारसंहितेच्या काळात शस्त्र बाळगल्याबद्दल भोसरीत एकावर कारवाई करण्यात आली असून या शस्त्राची किंमत ५ लाख ९५ हजार २२० रुपये आहे.तसेच १५० रुपयांची एक तलवार ५० हजार रुपयांचे २ पिस्टल ५००  रुपयांचे ५ काडतुस,एक रॉड ,एक सुरी जप्त करण्यात आली आहे.शस्त्राच्या कारवाईत एक रिक्षा आणि एक पाच लाख रुपये किमतीची चारचाकी मोटारही जप्त केले आहे.अवैध शस्त्रासंबंधी केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
......
आचार संहिता भंगाचे ७० गुन्हे दाखल, जिल्ह्यातील भरारी पथकाची कारवाई
भरारी पथकांने केलेल्या कारवाईत शिरूर लोकसभा मतदार संघात मोठ्याप्रमाणावर मद्य व पैसे जप्त करण्यात आले आहे. त्यात भोसरीत २० लाख रुपये तर जुन्नरमध्ये दोन ठिकाणी २ लाख ५६ हजार आणि १ लाख ७४ हजार ९०० रुपये अशी ४ लाख २४ हजार ९०० रुपये रक्कम जप्त केली.खेडशिवापुर येथील तपासणीत दुचाकीवरून २ लाख २८ हजार १२५ रुपये रक्कम दुचाकीवरून घेवून जाणा-यावर कारवाई करून गुरूवारी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र,ही रक्कम पेट्रोल पंपाची असल्याचे सांगितले जात आहे.पुणे लोकसभा मतदार संघातील कोथरूड येथीन ८ लाख १२ हजार ५०० रुपये, कसबा पेठेतून ९४ हजार ८०० तर पर्वतीतून १ लाख १९ हजार रुपये जप्त करण्यात आले.एकट्या भोसरीत मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत ५४ ठिकाणी अवैधपध्दतीने मद्य बाळगणा-यांवर कारवाई करण्यात आली आहे.त्यात भोसरीत २ हजार ३४५ लिटर मद्य जप्त करण्यात आले असून त्याची किमंत १ लाख ६२ हजार ३५२ एवढी आहे. मद्य बाळगणा-या व्यक्तींकडून पैसेही जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: 2 thousand liters of alcohol and 59 lakhs 90 thousand rupees seized in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.