मावळमध्ये तेरा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:41 PM2019-04-13T23:41:30+5:302019-04-13T23:43:55+5:30

२०१४ मध्ये झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत नोटाला १११८६ मते मिळाली होती.

The notes in Maval were heavy on thirteen people | मावळमध्ये तेरा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट

मावळमध्ये तेरा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट

Next

- योगेश्वर माडगूळकर 
पिंपरी : २०१४ मध्ये झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत नोटाला १११८६ मते मिळाली होती. त्यापेक्षा तेरा उमेदवारांना मते कमी मिळाली आहेत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये १६,०३० नोटा मतदान झाले. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी नोटा मतदानामध्ये ४८८४ मतांनी वाढ झाली होती.
लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही नोटा मतदानाची आकडेवारी वाढली आहे. पनवेल, उरण वगळता सर्वच विधानसभा मदतदारसंघामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी २७१२ नोटा मतदान झाले होते. विधानसभेसाठी २६६६ नोटा मतदान झाले. कर्जत मतदार संघामध्ये नोटा १२२१ मतदान झाले होते. विधानसभेसाठी नोटा २५२१ मतदान झाले. उरणमध्ये नोटा १७८४ मतदान झाले होते.


विधानसभेसाठी नोटा ११९९ मतदान झाले. मावळ मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी १५१६ नोटा तर विधानसभेसाठी २००६ मतदान झाले. चिंचवड मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी २०९१ मतदान झाले तर विधानसभेसाठी ४४३५ मतदान झाले. लोकसभेसाठी १११८६ नोटा मतदान झाले होते. तर विधानसभेसाठी १६०३० मतदान झाले होते. लोकसभेला पनवेल मतदारसंघातून सर्वांधिक म्हणजे २७१२ नोटा मतदान झाले होते. तर विधानसभेसाठी पिंपरी मतदारसंघातून ४४३५मतदान झाले होते. नोटा मतदान मशीनवर करण्याची सोय मशीनवर उपलब्ध करून दिली होती.

>नोटा म्हणजे काय?
NOTA म्हणजे Z None Of The Above (यापैकी कुणीही नाही). जर इव्हीएम मशिनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.

Web Title: The notes in Maval were heavy on thirteen people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.