'मजबूर नव्हे तर मजबूत सरकार पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 01:10 AM2019-04-14T01:10:09+5:302019-04-14T01:11:10+5:30

देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 'Not compulsory but strong government' | 'मजबूर नव्हे तर मजबूत सरकार पाहिजे'

'मजबूर नव्हे तर मजबूत सरकार पाहिजे'

googlenewsNext

वाडा : भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे आयोजित केलेल्या महामेळाव्यात देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महायुतीच्या वाडा येथे झालेल्या पहिल्याच मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याने व्यासपीठावर उपस्थित नेत्यांच्या चेह-यावर नाराजीचा भाव दिसत होता
भाजप, शिवसेना, रिपाई, श्रमजीवी संघटना व कुणबी सेना यांच्यावतीने भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्याची वेळ प्रत्यक्ष सकाळी अकरा वाजता असताना दुपारी चार वाजता सुरू झाला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी भाजप शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवत आहे तर विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. वाडा एमएमआरडीए क्षेत्रात येत नसल्याने विकास खुंटला आहे. यापुढे वाडा एमएमआरडीए क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की, वाडाचा विकास करण्याचा वादा केला. मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या चांगल्या कामामुळे या निवडणुकीत भ्रष्टाचार व महागाईचा मुद्दा नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार असून मी खासदार झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता खासदार असेल या भावनेने काम करेल असे सांगितले. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीच्या दुष्काळामुळे आयोजक आणि नेते एकमेकाचे तोंड चुकवत होते.
>अल्प प्रतिसाद, एकनाथराव विसरले कपिल पाटलांची निशाणी : मेळाव्यामध्ये निम्याहुन अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याने मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते. या मेळाव्यात गर्दी दिसावी म्हणून अल्पवयीन मुलांना सहभागी केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना कपिल पाटील यांच्या धनुष्यबान या निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी धनुष्यबाण, धनुष्यबाण असा तीन वेळा निशाणीचा नामोउल्लेख केल्यानंतर उमेदवार कपिल पाटील यांनी कमळ निशाणी असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर शिंदे यांची चूक लक्षात आली.
>नगरसेवकांचा बहिष्कार : या मेळाव्याला वाडा नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता.
>शिवसेनेच्या वाघांनी मारला रामनवमीला चिकन बिर्याणीवर ताव : वाडा येथे महायुतीच्या मेळावा शनिवारी रामनवमी या दिवशी आयोजित केला होता. या महामेळाव्यात उपस्थित सर्व कार्यकर्त्यासाठी भोजनासाठी चिकन बिर्याणी ची व्यवस्था केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये रामाच्या नावाने मते मागणारे रामनवमीच्या दिवशी चिकन बिर्याणीवर ताव मारत होते. अशी खंत प्रामाणिक कार्यकर्ते व्यक्त करीत होते.

Web Title:  'Not compulsory but strong government'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.