जगातील वेगवान क्रिकेटपटू...

क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये 'रनींग बिटवीन विकेट' (Running between wickets) याला फार महत्त्व असते. कधी कधी एकेरी-दुहेरी धाव घेत प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजांनी हैराण केले आहे. खेळपट्टीवर वेगाने धावणाऱ्या खेळाडूंवर कोणता खेळाडू आघाडीवर आहे, ते पाहूया.

इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो या क्रमवारीत दहाव्या स्थानावर येतो.

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल याचे नाव समोर आले की चौकार आणि षटकारांची आतषबाजी डोळ्यासमोर उभी राहते. मात्र, रनींग बिटवीन विकेटमध्ये जलद धावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो नवव्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो जितक्या वेगाने गोलंदाजी करतो त्याच वेगाने तो धावाही काढतो.

न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रेंडन मॅकलम हा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण तो खेळपट्टीवरही जलद वेगाने धावतो.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा चोरटी धाव घेण्यात एक्स्पर्ट आहे. वेगाने धावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सहाव्या स्थानी येतो.

बर्थडे बॉय हार्दिक पांड्या या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वॉर्नर हा उंचीने कमी असला तरी तो खेळपट्टीवर चपळतेने धावा घेतो.

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हीलियर्स याच्या फलंदाजीची शैली निराळीच आहे. त्याच्यासारखे फटकेबाजी करणे क्वचितच कोणाला जमेल. त्याचबरोबर तो चोरटी धाव घेण्यातही चपळ आहे.

महेंद्रसिंग धोनी रनींग बिटवीन विकेटमध्ये सर्वात चतुर फलंदाज मानला जातो. एका धावेचे दोन मध्ये किंवा दोन धावांचे तीनमध्ये रुपांतर कसे करायचे यात तो तरबेज आहे.

जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू विराट कोहली या क्रमावारीत आघाडीवर आहे.