वनडेमध्ये सर्वाधिक 5000 धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला विलियमसन

इंग्लंडविरुद्धच्या तिस-या वनडेमध्ये कर्णधार केन विलियमसननं शानदार शतक ठोकल्यानंतर न्यूझीलंडला 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवामुळे न्यूझीलंड मालिकेत 2-1नं पिछाडीवर गेला. कर्णधार केन विलियमसननं 143 चेंडूंत 112 धावांची खेळी करत 6 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.

विलियमसनच्या शतकानंतरही न्यूझीलंडला विजयापासून दूर राहावे लागले. परंतु कर्णधार विलियमसननं वनडे कारकिर्दीच्या इतिहासात स्वतःच्या नावे नवा रेकॉर्ड केला आहे.

विलियमसन हा न्यूझीलंडकडून वनडेमध्ये सर्वाधिक 5 हजार धावा काढणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

विलियमसननं 125 वनडे सामन्यात 5000 धावांचा पल्ला गाठला आहे.

विलियमसनच्या आधी हा रेकॉर्ड मार्टिन गुप्टिलच्या नावे होता. मार्टिननं 135 वनडे सामन्यात 5000 धावा पूर्ण केल्या होत्या.