अवघ्या 8 धावांनी हुकलं विराट कोहलीचं शतक, 92 धावांसाठी मारले अप्रतिम फटके

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीचं आपल्या वन-डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 31 वं शतक हुकलं

कर्णधार विराट कोहलीनं एकाबाजूनं दमदार खेळीच पर्दशन करताना 92 धावांची खेळी केली. दुर्देवानं त्याला शतकानं हुलकावणी दिली.(फोटो सौजन्य - बीसीसीआय)

विराट कोहलीच्या नावे30 शतके आहेत. सर्वाधिक शतकामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसह तो दुसऱ्या स्थानावर आहे.

विराटनं 107 चेंडूचा सामना करताना 8 चौकारांच्या मदतीनं 92 धावा ठोकल्या.

या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचूनही, भारताचा अख्खा डाव 50 षटकांत 252 धावांत आटोपला.

विराटनं आज जर शतक झळकावलं असतं तर ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडत सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असती.

सर्वाधिक शतके भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहेत. सचिननं वन-डेमध्ये 49 शतके झळकावली आहेत.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं एकतिसावं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. त्यानं 107 चेंडूंत आठ चौकारांसह 92 धावांची खेळी उभारली.