ऑस्ट्रेलियाविरूद्ध कोहलीने केला हा 'विराट' विक्रम

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात विराट कोहलीनं कर्णधार म्हणून खेळताना 36 सामन्यात 2000 धावांचा टप्पा पार केला. कर्णधार विराट कोहली 21 धावांवर बाद झाला. त्याला नाथन कूल्टर नाईलनं बाद केलं. कर्णधार म्हणून सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर झाला आहे.

यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ए.बी. डीव्हिलियर्स याच्या नावावर होता. त्याने 41 सामन्यात 2000 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने 47 सामन्यात 2000 धावा केल्या होत्या.

भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आणि इंग्लंडचा इयॉन मॉर्गन यांनी 48 सामन्यात हा टप्पा ओलांडला होता.

भारतीय क्रिकेटचा दादा अशी ओळख असलेला सौरव गांगुली आणि पाकिस्तानच्या इंझमाम उल-हकने 49 व्या सामन्यात 2000 धावा केल्या. याशिवाय वेस्ट इंडिजचे महान खेळाडू व्ही. रिचर्डस् यांनी 50 सामन्यांमध्ये हा टप्पा ओलांडला होता.