India Vs South Africa 2018 : पहिला दिवस गाजवला भारतीय गोलंदाजांनी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या कसोटीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.

भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधीक ४ बळी मिळवले आहेत. याव्यतिरीक्त बुमराह, पांड्या, अश्विन आणि शमी यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.

आफ्रिकेच्या पहिल्या 3 विकेट अवघ्या 12 धावांमध्ये माघारी परतल्यामुळे यजमान संघाची अवस्था बिकट झाली होती. मात्र, यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसीस आणि एबी डिव्हीलियर्सने संघाचा डाव सावरला.

भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा सुरू झाला आहे. स्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणा-या भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल.

2018-19च्या कडव्या मोसमाची सुरुवात द. आफ्रिकेविरुद्ध तीन कसोट्यांद्वारे होत आहे. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा असेल. हे सत्र कर्णधार विराट कोहली आणि सहका-यांसाठी महत्त्वाचे आहे. ‘घरचे शेर विदेशात ढेर’ हा समज चुकीचा ठरवून कामगिरी सुधारण्यासाठी झुंज द्यावी लागेल

भारताचे यश वेगवान मा-यावर ब-याच अंशी विसंबून आहे. रँकिंगमध्ये भारताने द. आफ्रिकेवर वर्चस्व गाजविले आहे. संघाने 0-3 ने मालिका गमावली, तरीही हे स्थान अबाधित राहील. कोहलीच्या संघासाठी मात्र केवळ आकडे आणि रँकिंग महत्त्वाचे नाही