भारताचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय

ही मालिका जिंकल्यानंतर आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये भारताने दुस-या स्थानावर मजल मारली आहे. या रॅंकिंगमध्ये दक्षिण ऑफ्रिका पहिल्याच स्थानावर असून ऑस्ट्रेलिया तिस-या स्थानावर आहे. याआधी भारत पाचव्या स्थानावर होता.

कसोटीच्या चौथ्या सामन्यात दक्षिण ऑफ्रिकेने ४८१ धावांचा पाठलाग करताना अवघ्या ७२ षटकात ७२ धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेवर मिऴवलेला विजय हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा फरकांचा विजय आहे.

हाशिम अमला आणि एबी डिविलियर्स आत्तापर्यंत सर्वांत हळू म्हणजेच टुकु-टुकु खेणा-यांच्या यादीत बसले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज हाशिम अमला या सामन्यात पुरेपूर अयशस्वी ठरला. त्याने या सामन्यात २०७ चेंडूत फक्त नाबाद २३ धावा केल्या. तर एकदिवसीय सामन्यात अवघ्या ३१ चेंडूत शतक झळकाविणारा दक्षिण ऑफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलियर्सने ९१ चेंडूत एक चौकार लगावत फक्त ११ धावा केल्या.

भारताचा गोलंदाज रविंद्र जडेजाने या मालिकेत सलग १८ षटकांची निर्धाव गोलंदाजी केली. रविंद्र जडेजाने या मालिकेत ३५ षटकांची गोलंदाजी केली यामध्ये त्याने अवघ्या २० धावा देत दोन बळी घेतले.

भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेला चौथ्या कसोटी सामन्यात सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने या मालिकेत सर्वाधिक २६६ धावा केल्या. अजिंक्य रहाणे आत्तापर्यंत २२ कसोटी सामने खेळले असून एकूण १६१९ धावा त्याने केल्या आहेत.

या मालिकेत सर्वाधिक बळी घेणा-या आर. अश्विनला मालिकावीर पुरसकाराने सन्मानित करण्यात आले. सचिन तेंडुलकर व विरेंद्र सेहवाग यांच्या यादीत आर. अश्विन बसला स्थान मिळाले असून तो आता मालिकावीर हा पुरस्कार पाच वेळा मिऴविणारा तिसरा भारतीय ठरला आहे. आर. आश्निनने आत्तापर्यंत ३२ कसोटी सामने खेऴले असून १७६ बऴी टिपले आहेत.

चौथ्या व शेवटच्या कसोटीत सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारताने ३३७ धावांनी पराभव करत कसोटी मालिकेवर ३ - ० असा दणदणीत विजय मिळविला.