हार्दिक पांड्याचा घणाघात

हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी यांनी केलेली विस्फोटक फलंदाजी ही भारताच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले.

अशा परिस्थितीत पांड्याने तुफान फटकेबाजी करत भारताला सुस्थितीत आणले.

त्याने 66 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 83 धावा फटकावल्या.

पांड्या आणि धोनीने सहाव्या विकेटसाठी केलेल्या 118 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने 281 धावा काढल्या.