क्रिकेटर्सच्या अंगा-खांद्यावरील टॅटूंचं चाहत्यांमध्ये आकर्षण!

भारतीय क्रिकेटर्सची स्टाईल त्यांचे चाहते नेहमीच फॉलो करत असतात. अनेक क्रिकेटर्सचे टॅटू त्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. चला बघुया कोणत्या क्रिकेटर्सचे टॅटू नेहमी आकर्षित करतात.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचा टॅटू नेहमीच चर्चेत असतो. विराटने खांड्यापासून ते हातापर्यंत एक लांबलचक टॅटू काढला आहे.

शिखर धवन यानेही विराटप्रमाणेच लांबलचक टॅटू काढला आहे. पण हा त्याने उजव्या हातावर काढला आहे.

क्रिकेटर हार्दिक पांड्याने वाघाचा टॅटू खांद्यावर काढून घेतलाय.

रविंद्र जडेजा याने उजव्या हातावर घोड्याचा सुंदर टॅटू काढून घेतलाय. इतकेच नाही तर त्याच्या पाठीवरही एक टॅटू आहे.

के.एल.राहुल हा तर टॅटूचं दुकान वाटतो. कारण त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी टॅटू आहेत.

क्रिकेटर उमेश यादवचेही टॅटू नेहमी लक्ष वेधून घेतात.