वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात लढणार, त्यांना पराभूत करणार! डाव्या पक्षांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 01:59 PM2019-03-31T13:59:09+5:302019-03-31T14:01:13+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाल्यानंतर डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

we will work to ensure the defeat of Rahul Gandhi in Wayanad - Prakash Karat | वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात लढणार, त्यांना पराभूत करणार! डाव्या पक्षांचे आव्हान

वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात लढणार, त्यांना पराभूत करणार! डाव्या पक्षांचे आव्हान

Next

तिरुवनंतपुरम - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, काँग्रेसकडूनराहुल गांधीवायनाड येथून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाल्यानंतर डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे केरळमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी पुकारलेली थेट लढाई असून, येथे त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे डाव्या पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेसचा हा निर्णय डाव्या पक्षांच्या नेत्यांना फारसा रुचलेला नाही. कांग्रेसने घेतलेला निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात लढण्यास दिेलेले असून, येथे त्यांचा पराभव करण्यासाठी पक्ष करेल, असे डाव्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने उचललेले हे पाऊल म्हणजे 2019 मध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठीच्या काँग्रेसच्या कटिबद्धतेविरुद्ध आहे, असे डाव्या पक्षांचे म्हणणे आहे. 
सीपीएमचे माजी महासचिव महासचिव प्रकाश करात यांनी सांगितले की, "वायनाड येथून राहुल गांधींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णयाचा अर्थ आता केरळमध्ये डाव्यांविरोधात लढण्यालाच काँग्रेसचे प्राधान्य आहे, असा होतो. एकीकडे काँग्रेसवाले भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगतात. तर दुसरीकडे ते वायनाड येथून राहुल गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात.'' 





केरळचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ डावे नेते पी. विजयन यांनीही राहुल गांधी यांच्या वायनाड येथून निवडणूक लढवण्याबाबत नाराजी व्यक्त केली  आहे. '' राहुल गांधी हे केरळमधील 20 पैकी एका जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्यातून काही वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्याविरोधात लढणार आहोत. राहुल गांधी यांना दोन ठिकाणांहून लढायचे होते तर त्यांनी जिथे विरोधात भाजपाचा उमेदवार असेल, अशा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे होती. काँग्रेसने आज घेतलेला निर्णय म्हणजे डाव्यांशी पुकारलेला थेट लढा आहे.''असे विजयन म्हणाले.  





दक्षिणेत पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दक्षिणेकडील राज्यामधील एखाद्चा मतदारसंघातून निवडणूल कढवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यात तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या केरळमधील वायनाड मतदारसंघातून असे राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार काँग्रेसने आज  राहुल गांधी हे वायनाड येथून निवडणूक लढवतीत, अशी अधिकृत घोषणा केली. 

Web Title: we will work to ensure the defeat of Rahul Gandhi in Wayanad - Prakash Karat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.