लग्न ठरलं, वडील तयारीत गुंतले; पण पोरगी दीड लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत पळाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 04:40 PM2024-01-14T16:40:10+5:302024-01-14T16:41:43+5:30

प्रियकरासोबत जाताना तरुणीने आपल्या वडिलांनी जमवलेले १ लाख ७० हजार रुपयेदेखील नेले. 

The marriage was fixed the father engaged in the preparations But the girl ran away with her boyfriend with one and a half lakh rupees | लग्न ठरलं, वडील तयारीत गुंतले; पण पोरगी दीड लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत पळाली!

लग्न ठरलं, वडील तयारीत गुंतले; पण पोरगी दीड लाख रुपये घेऊन प्रियकरासोबत पळाली!

आग्रा : कुटुंबातील लोक लग्नाच्या तयारीत गुंतले असतानाच नवरी मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पळून जाताना तरुणीने तिच्या लग्नासाठी वडिलांनी जमवलेले पैसेही नेले आहेत. ट्रान्स यमुना परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ट्रान्स यमुना येथील एका तरुणीचे लग्न जमल्याने तिचे वडील लग्नाच्या तयारीत व्यग्र होते. मुलीच्या लग्नात काही कमी पडू नये, यासाठी ते पैशांची जमवाजमव करत होते. मात्र तरुणीच्या मनात दुसरंच काही सुरू होतं. तिचं दुसऱ्या तरुणावर प्रेम होतं. मनाविरुद्ध लग्न होत असल्याने तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. प्रियकरासोबत जाताना तिने आपल्या वडिलांनी जमवलेले १ लाख ७० हजार रुपयेदेखील नेले. 

लवकरच होणार होतं लग्न

लग्नाच्या आधीच मुलगी पळून गेल्याचं कळताच तिच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी सांगितलं की, "मी माझ्या मुलीचं लग्न सिकंदरा परिसरातील एका तरुणाशी जमवलं होतं. त्यांचा साखरपुडा झाला होता आणि लग्नाला १४ फेब्रुवारी हा मुहूर्त ठरला होता. आता लग्नपत्रिका छापण्याची आमची तयारी सुरू होती. मात्र मुलीचं दुसऱ्या तरुणाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती."

दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीचा प्रियकर आणि त्याच्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title: The marriage was fixed the father engaged in the preparations But the girl ran away with her boyfriend with one and a half lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.