कोणते चिन्ह हवे बोला! झेंडा आहे, टोप्याही आहेत आणि रुमालदेखील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 11:47 AM2024-03-24T11:47:28+5:302024-03-24T12:12:15+5:30

राजकीय पक्षांच्या साहित्याची जबरदस्त विक्री ई-कॉमर्स मंचांवरून सुरू आहे. राजकीय पक्षाचे नाव टाइप करा आणि हवे ते साहित्य घरबसल्या मागवा, असे चित्र आहे. 

Tell me which sign you want! There is a flag, there are caps and even handkerchiefs | कोणते चिन्ह हवे बोला! झेंडा आहे, टोप्याही आहेत आणि रुमालदेखील

कोणते चिन्ह हवे बोला! झेंडा आहे, टोप्याही आहेत आणि रुमालदेखील

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्ष, उमेदवारांनी प्रचार प्रारंभ केला आहे. पुढील दाेन महिने देशभरात निवडणुकीचा ज्वर चढलेला दिसणार आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या विविध साहित्याला या काळात मागणी वाढलेली असते. त्यात आता ई-कॉमर्स कंपन्यांनीही उडी घेतली आहे. राजकीय पक्षांच्या साहित्याची जबरदस्त विक्री ई-कॉमर्स मंचांवरून सुरू आहे. राजकीय पक्षाचे नाव टाइप करा आणि हवे ते साहित्य घरबसल्या मागवा, असे चित्र आहे. 

या वस्तूंची जाेरदार विक्री
ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून विक्री होणाऱ्या वस्तूंत भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ, आपचे चिन्ह झाडू, काँग्रेसचे चिन्ह पंजा आणि राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ इत्यादींचा समावेश आहे. 
सर्व पक्षांचे रुमाल, दुपट्टे, पेंडंट, टी शर्ट, चिन्हांकित पेन आणि टोप्या यांचीही जोरदार विक्री सुरू आहे.
समाजवादी पार्टीचा लाेगाे असलेल्या की-चेन, तृणमूलचे चिन्ह असलेले नाइट लॅम्प, माकपाचे वाहनांवर लावता येणारे झेंडे, इत्यादी साहित्यांचीही विक्री हाेत आहे.

अशी झाली सुरुवात
२०१९ च्या निवडणुकीत हा कल सुरू झाला. सर्वच साहित्य ऑनलाइन विकले जात असेल तर निवडणूक साहित्य का नको, असा प्रश्न निर्माण झाला. विक्रेत्यांनीच पुढाकार घेऊन या वस्तू आमच्या मंचवर टाकायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

पक्षांची स्वत:च्याच वेबसाइटवरून साहित्याची विक्री
काही राजकीय पक्षांनी आपल्याच वेबसाइट्सवर आपल्या साहित्याची विक्री सुरू केली आहे. उदा. नमो मर्चंडाइज वेबसाइटवर नरेंद्र मोदींशी संबंधित अनेक वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. 
आता ऑनलाइन विक्री होत असल्यामुळे तिकडेही पुरवठा वाढला आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून वाढत मागणी आहे. निवडणूक रॅलीसाठीदेखील मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात.

७०% विक्रीत वाढ गेल्या लाेकसभा निवडणुकीच्या तुलनेत.
४०%एकूण विक्रीतील वाटा हा निवडणुकीशी संबंधित साहित्यांचा आहे.
३०० काेटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल निवडणुकीच्या काळात हाेण्याचा अंदाज आहे.
६०० पेक्षा जास्त साहित्यांची विक्री दरराेज एका पुरवठादाराकडे हाेत आहे.

Web Title: Tell me which sign you want! There is a flag, there are caps and even handkerchiefs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.