राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 11:10 AM2019-03-31T11:10:29+5:302019-03-31T11:32:57+5:30

राहुल गांधी यांच्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसने आज अधिकृत घोषणा केली आहे.

Rahul Gandhi will contest Lok Sabha elections from two constituencies | राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

Next

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, राहुल गांधी यांच्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसने आज अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच दक्षिण भारतातील केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. 

काँग्रेसकडून आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमधून याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ''काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. ते केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील, हे सांगताना मला आनंद होत आहे.''असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांनी सांगितले.


 
तर केरळमधील वायनाड हा मतदारसंघ भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा मतदारसंघ केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा तीन राज्यांना जोडतो. भाजपा सरकारच्या काळात दक्षिण भारतातील सांस्कृतिक ठेव्यावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला आहे. उत्तर आणि दक्षिण भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते आहे. ते नाते दृढ करण्यासाठी राहुल गांधी दक्षिण भारतातून लढणार आहेत,'' असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदी 2014 मध्ये गुजरातबरोबरच वाराणसी येथून का निवडणूक लढले होते, असा सवालही सुजरेवाला यांनी यावेळी विचारला. 



 

केरळ काँग्रेस कमिटीने राहुल यांना वायनाडमधून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. लोकसभेची फेररचना झाल्यानंतर २००८ पासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. या मतदार संघात कन्नूर, मलाप्पूरम आणि वायनाडचा समावेश असून २००८ पासून या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. 

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील अमेठी या मतदारसंघामधून तीन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात काँग्रेसला अधिक फायदा व्हावा यासाठी राहुल गांधी यांनी दक्षिण भारतातून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात येत होती. 
 

Web Title: Rahul Gandhi will contest Lok Sabha elections from two constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.