खिशात नाही रुपया, तरी निवडणुकीच्या रिंगणात; अपक्ष उमेदवारांची संपत्ती पाहून सगळेच अवाक्  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:07 AM2024-04-17T06:07:56+5:302024-04-17T06:09:04+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे.

No rupees in the pocket, but in the election arena Everyone is speechless seeing the wealth of independent candidates | खिशात नाही रुपया, तरी निवडणुकीच्या रिंगणात; अपक्ष उमेदवारांची संपत्ती पाहून सगळेच अवाक्  

खिशात नाही रुपया, तरी निवडणुकीच्या रिंगणात; अपक्ष उमेदवारांची संपत्ती पाहून सगळेच अवाक्  

लोकमत न्यूज नेटवर्क  
नवी दिल्ली
: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यांतील १०२ जागांसाठी १६२५ उमेदवार रिंगणात आहे. त्यापैकी १६१८ उमेदवारांच्या निवडणूक अर्जाचा अभ्यास केला असता, १० उमेदवारांकडे एकही रुपया नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यापैकी आठजण तामिळनाडूतील, तर दोघे महाराष्ट्रातील आहेत.

७९.३६ लाख सर्व अपक्ष उमेदवारांची सरासरी संपत्ती 
८.९९ कोटी सर्व पक्षांतील उमेदवारांची सरासरी संपत्ती
४.५१ कोटी सर्व उमेदवारांची सरासरी संपत्ती

शून्य संपत्ती असलेले उमेदवार
नाव    मतदारसंघ (राज्य)    पक्ष

  • अरविंद तांडेकर    रामटेक (महाराष्ट्र)    अपक्ष
  • किवीनसुका सूर्यवंशी    नागपूर (महाराष्ट्र)    देजपा
  • देवेंद्र आर.    चेन्नई उत्तर (तामिळनाडू)    अपक्ष
  • विजयन के.    आराक्कोनम (तामिळनाडू)    एआयजेएमके 
  • पीपी जयप्रकाश    वेल्लोर (तामिळनाडू)    अपक्ष
  • अल्बर्ट फ्रान्सिस झेव्हियर कृष्णगिरी (तामिळनाडू) अपक्ष     
  • साथियाराज एन.    विलुपूरम (तामिळनाडू)    अपक्ष
  • गुणासेकरन के.    विलुपूरम (तामिळनाडू)    अपक्ष
  • आर. अन्बिन अमुदन    तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) अपक्ष
  • सुरेश    तिरुनेलवेली (तामिळनाडू)    अपक्ष

Web Title: No rupees in the pocket, but in the election arena Everyone is speechless seeing the wealth of independent candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.