अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणारं बजेट आणू- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 11:04 AM2018-01-29T11:04:46+5:302018-01-29T14:32:32+5:30

यंदाचं बजेट देशाच्या जलदगतीने पुढे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देईल.

narendra modi statement on budget session 2018 | अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणारं बजेट आणू- नरेंद्र मोदी

अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणारं बजेट आणू- नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली- बजेट अधिवेशन अतिशय महत्त्पपूर्ण आहे. संपूर्ण विश्व भारताच्या अर्थव्यवस्थेप्रती आशावादी आहे. भारताच्या प्रगतीवर दुनियेतील सगळ्यांनीच मोहर उमटवली आहे. यंदाचं बजेट देशाच्या जलदगतीने पुढे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देईल. बजेटनंतर विविध कमिटी यावर चर्चा करतील. बजेटवर एका चांगल्या संवादाची अपेक्षा आहे. आम्ही सर्व पक्षीय बैठकीतही यामुद्द्यावर चर्चा केली होती, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. संसदेचं बजेट अधिवेशन आजपासून सुरू झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणानंतर अधिवेशनाची सुरूवात झाली. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर अर्थमंत्री अरूण जेटली आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. बजेच अधिवेशनाच्या आधी नरेंद्र मोदींनी माध्यमांना संबोधित केलं. 



 



 

माध्यमांशी बोलताना नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरही मत मांडलं. सर्व राजकीय पक्षांनी तिहेरी तलाकचं विधेयक पास करण्यासाठी मदत करावी, असं अपील मी करणार असल्याचं मोदी म्हणाले. तिहेरी तलाकचं विधेयक पास करून मुस्लीम महिलांना भेट द्यावी, यासंदर्भातील आवाहन बजेट अधिवेशनात करणार असल्याचं मोदींनी म्हंटलं. 

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं हे पहिलं अभिभाषण होतं. राष्ट्रपतींचं अभिभाषण केंद्र सरकारचं दस्तावेज असतं ज्यामध्ये केंद्र सरकारच्या गेल्या वर्षीच्या घडामोडी आणि त्याबरोबरच येणाऱ्या आर्थिक वर्षातील सरकारचं विजन, योदना आणि अजेंण्ड्याची माहिती असते. बजेट अधिवेशनाचं पहिलं सत्र 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी असेल तर दुसरं सत्र 6 मार्च के 6 एप्रिल असेल. 
 

Web Title: narendra modi statement on budget session 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.