माजी मुख्यमंत्र्यांसाठी लढाई झाली अवघड?

By वसंत भोसले | Published: May 2, 2024 07:08 AM2024-05-02T07:08:41+5:302024-05-02T07:08:55+5:30

हावेरीतून माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारी मागितली हाेती. ती न मिळाल्याने ईश्वराप्पा यांनी शिवमाेग्गातून बंड केले आहे.

lok sabha election 2024 Was the battle difficult for the former chief minister in karnataka | माजी मुख्यमंत्र्यांसाठी लढाई झाली अवघड?

माजी मुख्यमंत्र्यांसाठी लढाई झाली अवघड?

डॉ. वसंत भोसले

बंगळुरू : उत्तर कर्नाटकातील हावेरी लाेकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांची मुख्य लढत काॅंग्रेसचे उमेदवार आनंदस्वामी गड्डादेवरा मठ यांच्याशी आहे. भाजपने ही जागा २००९ पासून सातत्याने जिंकली आहे.

हावेरीतून माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारी मागितली हाेती. ती न मिळाल्याने ईश्वराप्पा यांनी शिवमाेग्गातून बंड केले आहे.

भाजपने हॅटट्रीक  करणारे शिवकुमार उदासी यांना डावलून बाेम्मई यांना उमेदवारी दिली आहे. हावेरीमधील पाच आणि गदग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ या लाेकसभा मतदारसंघात येतात. विधानसभेला भाजपला एकच तर काँग्रेसला सात ठिकाणी विजय मिळाला हाेता. ताे प्रभाव कायम राहिल्यास बाेम्मई यांना ही निवडणूक जड जाईल, असा अंदाज आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

सर्वच क्षेत्रात मागास असल्याचा ठपका या  मतदारसंघावर आहे. 

पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या

असल्याने बेदती हल्ला नदी वरदा नदीला जोडण्याची मागणी

औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे

मोठी गुंतवणूक आणणे हे आव्हान

२०१९ मध्ये काय घडले?

शिवकुमारी उदासी

भाजप (विजयी)

६,८३,६६०

डी. आर. पाटील

काँग्रेस

५,४२,८८७

Web Title: lok sabha election 2024 Was the battle difficult for the former chief minister in karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.