दररोज 100km सायकल चालवणारे फिटनेस आयकॉन अनिल कडसूर यांचे Heart Attack ने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 09:03 PM2024-02-04T21:03:48+5:302024-02-04T21:04:57+5:30

45 वर्षीय अनिल कडसूनर यांनी दररोज 100km सायलक चालवण्याचा अनोखा विक्रम केला होता.

famous-cyclist-anil-kadsur-dies-of-heart-attack-at-the-age-of-45 | दररोज 100km सायकल चालवणारे फिटनेस आयकॉन अनिल कडसूर यांचे Heart Attack ने निधन

दररोज 100km सायकल चालवणारे फिटनेस आयकॉन अनिल कडसूर यांचे Heart Attack ने निधन

फिटनेस आयकॉन आणि बंगळुरुतील प्रसिद्ध सायकलपटू अनिल कदासूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 45 वर्षीय कडसूर यांनी सलग 42 महिने दररोज 100 किलोमीटर सायकलिंग करण्याचा विक्रम केला होता. 31 जानेवारी रोजी अनिल यांनी सोशल मीडियावर हा अनोखा विक्रम पूर्ण केल्याची माहिती दिली होती. त्याच रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले.

2.25 लाख किलोमीटरहून अधिक सायकल चालवली
सायकल चालवण्याचा एक दशकाहून अधिक अनुभव असलेल्या कदासूर यांनी 2.25 लाख किलोमीटरहून अधिक सायकल चालवली आहे. त्यांचा हा अनोखा विक्रम अनेक सायकलस्वारांसाठी मोठी प्रेरणा आहे. त्यांच्याशी फक्त हस्तांदोलन करणे म्हणजे अनेक लोकांसाठी ऊर्जा आणि सकारात्मकता मिळवण्यासारखे होते. त्यांच्या अशा अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

रोज 100 किमी सायकल चालवण्याचा छंद
अनिल कडसूर अतिशय नम्र स्वभावाचे होते. ते नेहमी नवीन सायकलस्वारांना प्रोत्साहन आणि सल्लेही द्यायचे. जवळचे लोक त्यांना 'द्रोणाचार्य' म्हणत. 
विशेष म्हणजे, ते दररोज 100 किलोमीटर सायकल चालवायचे. हीच त्यांची खास ओळख होती. ऑगस्ट 2022 मध्ये एका सायकलिंग क्लबने त्यांना सलग 10 दिवस 100 किलोमीटर सायकल चालवण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान तर त्यांनी पूर्ण केलेच, पण यानंत त्यांना दररोज 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा छंद जडला. आता त्यांच्या अकाली जाण्याने कडसूर यांची सायलक थांबली...

Web Title: famous-cyclist-anil-kadsur-dies-of-heart-attack-at-the-age-of-45

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.