निवडणुकीत ड्रग्ज, पैशांचा महापूर! ४,६५० काेटींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 05:54 AM2024-04-16T05:54:51+5:302024-04-16T05:55:41+5:30

४५ टक्के वाटा केवळ नशेचा; आयाेगाची कारवाई

Deluge of drugs and money in elections 4,650 crore worth of goods seized | निवडणुकीत ड्रग्ज, पैशांचा महापूर! ४,६५० काेटींचा मुद्देमाल जप्त

निवडणुकीत ड्रग्ज, पैशांचा महापूर! ४,६५० काेटींचा मुद्देमाल जप्त

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीत पैशांचा दुरुपयाेग राेखण्यासाठी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४,६५० काेटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरराेज सरासरी १०० काेटी रुपयांची जप्ती हाेत असल्याची माहिती निवडणूक आयाेगाने दिली. धक्कादायक म्हणजे, यामध्ये जवळपास ४५ टक्के वाटा हा ड्रग्जचा आहे. 

आयाेगाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४,६५८ काेटी रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत जप्त केलेला मुद्देमाल जास्त आहे. लाेकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान सुरू हाेण्यापूर्वीच एवढा मुद्देमाल जप्त झाला आहे. लाेकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक जप्तीची कारवाई यावेळी हाेण्याच्या मार्गावर आहे. 

३,४७५ काेटी रुपयांचा मुद्देमाल २०१९च्या निवडणुकीदरम्यान जप्त केला हाेता. यंदा मतदान सुरू हाेण्यापूर्वीच हा आकडा पार झाला आहे.

या वर्षी ७५ टक्के वाटा ड्रग्जचा
- या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालात ७५ टक्के वाटा हा ड्रग्जचा हाेता.
- आयाेगाने लाेकसभा निवडणूक डाेळ्यांसमाेर ठेवूनच वर्षाच्या सुरुवातीपासून याकडे लक्ष केंद्रित केले हाेते.

सरकारी कर्मचाऱ्यांवर आयाेगाची कारवाई
निवडणुकीच्या दरम्यान राजकीय नेत्यांना प्रचारात मदत करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा १०६ जणांवर कारवाई झाल्याचे आयाेगाने म्हटले आहे.

दरराेज सरासरी १०० काेटींचा मुद्देमाल जप्त केला जात आहे. ३९५ काेटी रुपये राेख, ४८९ काेटी रुपयांचे मद्य आणि २,०६९ काेटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 

Web Title: Deluge of drugs and money in elections 4,650 crore worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.