साध्वी प्रज्ञा सिंहांच्या 'रोड शो'त गोंधळ; काळे झेंडे दाखवणाऱ्या NCPच्या कार्यकर्त्यांना मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 03:30 PM2019-04-23T15:30:16+5:302019-04-23T15:32:50+5:30

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या रोड शो दरम्यान दोन तरुणांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.

Clashes broke out during BJP candidate Sadhvi Pragya Singh Thakur's roadshow in Madhya Pradesh capital Bhopal | साध्वी प्रज्ञा सिंहांच्या 'रोड शो'त गोंधळ; काळे झेंडे दाखवणाऱ्या NCPच्या कार्यकर्त्यांना मारहाण 

साध्वी प्रज्ञा सिंहांच्या 'रोड शो'त गोंधळ; काळे झेंडे दाखवणाऱ्या NCPच्या कार्यकर्त्यांना मारहाण 

Next

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी जुने भोपाळमधील भवानी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रोड शो काढला. 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या रोड शो दरम्यान एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविणाऱ्या एनसीपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेमुळे रोड शो दरम्यान गोंधळ उडाला. पोलिसांनी एनसीपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सरु आहे. 


भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


दरम्यान, मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका होत आहे. 

‘मी शहिदांचा अपमान केला नाही’
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली होती. या नोटिसीला उत्तर देताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहिदांचा अपमान केला नाही, असे म्हटले आहे. "मी कोणत्याही शहीदाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. माझ्या भाषणातील एक लाइन पाहून चालणार नाही, तर पूर्ण भाषण पाहावे. तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मला जो त्रास देण्यात आला होता, त्याचा मी उल्लेख केला होता.", असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. 


साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या होत्या, वाचा त्यांच्याच भाषेत...
"वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा."
"ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए."
"मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ."



 

Web Title: Clashes broke out during BJP candidate Sadhvi Pragya Singh Thakur's roadshow in Madhya Pradesh capital Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.