भले भले गार! अखिलेश यादवांनी मोदींच्या वाराणसीशेजारचा मतदारसंघ तृणमूलला दिला; का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:54 AM2024-03-16T11:54:36+5:302024-03-16T11:55:19+5:30

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूर्वांचलची महत्वाचा मतदारसंघ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Akhilesh Yadav gave Bhadohi to TMC; Close to Modi's Varanasi constituency, Bramhan vote politics | भले भले गार! अखिलेश यादवांनी मोदींच्या वाराणसीशेजारचा मतदारसंघ तृणमूलला दिला; का?

भले भले गार! अखिलेश यादवांनी मोदींच्या वाराणसीशेजारचा मतदारसंघ तृणमूलला दिला; का?

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी तोडली आहे. तिथे स्वतंत्र लढत असून उत्तर प्रदेशच्या बहुचर्चित जागांपैकी एक असलेल्या भदोहीमध्ये मोठी चाल खेळली आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूर्वांचलची महत्वाचा मतदारसंघ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अखिलेश यादव यांनी असे का केले, याचे उत्तर शोधण्यात भले भले राजनिती तज्ञ आश्चर्यचकीत झाले आहेत. 

अखिलेश यांनी याची घोषणा करताच ममता यांनी ललितेशपती त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली आहे. या मतदारसंघावर सपाचे वर्चस्व आहे. सपाचा गड मानला जाणारा मतदारसंघ अखिलेश यांनी टीएमसीसाठी का सोडला, असा प्रश्न सपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या नेत्यांनाही धक्का बसला आहे. 

भदोही लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये ज्ञानपुर, भदोही आणि औराई हे जिल्ह्यातील तर प्रयागराज जिल्ह्यातील प्रतापपुर आणि हंडिया असे पाच मतदारसंघ आहेत. महत्वाचे म्हणजे या मतदारसंघात ब्राम्हण मतदारांची मते निर्णायक ठरतात. जवळपास तीन लाख ब्राम्हण मतदार आहेत. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी मतदारसंघही जवळ आहे. 

ललितेशपती त्रिपाठी कोण?
अखिलेश यांनी हा मतदारसंघ का सोडला? य़ाच्यामागे अनेक समीकरणे आहेत. परंतु आणखी एक समीकरण म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचे ते नातू आहेत. ललितेश हे काँग्रेसच्या तिकीटावर मिर्झापूरच्या मदिहान मतदारसंघातून आमदार होते. वाराणसी भागात कमलापती त्रिपाठी यांचे घर राजकीय केंद्र होते. 2021 मध्ये ललितेश यांनी काँग्रेस सोडली होती. प्रियंका गांधी यांचे ते जवळचे मानले जायचे. २०१९ मध्ये ते लोकसभा निवडणूक हरले होते. 

Web Title: Akhilesh Yadav gave Bhadohi to TMC; Close to Modi's Varanasi constituency, Bramhan vote politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.