नांदेड तालुक्यात 18 मतदान केंद्रे बदलली; मतदारांत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 09:59 AM2019-04-18T09:59:17+5:302019-04-18T09:59:41+5:30

सदर अठरा मतदान केंद्र बदलाची नोंद सदरील मतदान केंद्रात ज्या मतदारांची नोंद आहे त्यांनी ही बदलाची नोंद घेण्याचे आवाहन लतीफ पठाण 87 नांदेड दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अनुराधा ढालकरी 86 नांदेड उत्‍तरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.

18 polling stations changed in Nanded taluka; The clutter of voters | नांदेड तालुक्यात 18 मतदान केंद्रे बदलली; मतदारांत गोंधळ

नांदेड तालुक्यात 18 मतदान केंद्रे बदलली; मतदारांत गोंधळ

Next

नांदेड : नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 87 नांदेड दक्षिणचे अकरा मतदान केंद्र व 86 नांदेड उत्‍तरचे सात असे एकूण अठरा मतदान केंद्राच्‍या ठिकाणांमध्ये मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍या 30 मार्च 2019 च्‍या पत्राने विविध तांत्रिक कारणास्तव बदलण्यात आले आहेत. या बदलामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


या केंद्रामध्ये 87 नांदेड दक्षिणमधील पुर्वीचे 28,29,30 नांदेड कलामंदिर ऐवजी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड पदवी पदयुत्तर केद्रीय ग्रंथालय अभ्यासिका इमारत येथे स्‍थलांतरीत झाले आहे. पूर्वीचे 54,55,56,57 व  58 नांदेड उपवनसंरक्षक रेंज फॉरेस्ट कार्यालय ऐवजी नांदेड वाघाळा शहर म.न.पा. प्राथमिक शाळा वजीराबाद,येथे स्‍थलांतरीत झाले आहे. पूर्वीचे 63,64 नांदेड निरिक्षक वैद्यमापन शास्त्र विभाग ऐवजी प्रतिभा निकेतन महाविद्यालय  येथे स्‍थलांतरीत झाले आहे. तर पूर्वीचे 122 नांदेड हातमाग सोसायटी कार्यालय चौफाळा ऐवजी केंद्रिय प्राथमिक शाळा चौफाळा खोली क्रमांक 3 असा अकरा मतदान केंद्रात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गोंधळ उडाला.


उर्वरीत 86 नांदेड उत्‍तर मधील सात मतदान केंद्रामध्‍ये 156 ऑक्‍सफर्ड इंन्‍टर नॅशनल स्‍कुल वाडी बू.  ऐवजी जिल्‍हा परीषद प्राथमिक शाळा नविन इमारत नविन वाडी बू. येथे स्‍थलांतरीत झाले आहे. 199 म.न.पा. शाळा नं.5 लेबर कॉलनी ऐवजी विवेकवर्धीनी शाळा येथे स्‍थलांतरीत झाले आहे. केंद्र क्र.200 म.न.पा. शाळा नं.5 लेबर कॉलनी ऐवजी राणी लक्ष्‍मीबाई माध्‍यमिक विदयालय यशवंतनगर येथे स्‍थलांतरीत झाले आहे. केंद्र क्र.201 व 234 म.न.पा. शाळा नं.5 लेबर कॉलनी ऐवजी नवनिकेतन प्राथमिक शाळा रामानंद नगर येथे स्‍थलांतरीत झाले आहे. केंद्र क्र.334 इस्लामउल अमल प्राथमिक शाळा ऐवजी हजरत फारुख उर्दु प्राथमिक शाळा मिल्‍लतनगर येथे स्‍थलांतरीत झाले आहे तर 335 जिल्‍हा परीषद प्राथमिक शाळा चौफाळा ऐवजी मॉर्डन उर्दू शाळा पाकीजा नगर येथे स्‍थलांतरीत झाले आहे.   

बदलांची नोंद घ्यावी
सदर अठरा मतदान केंद्र बदलाची नोंद सदरील मतदान केंद्रात ज्या मतदारांची नोंद आहे त्यांनी ही बदलाची नोंद घेण्याचे आवाहन लतीफ पठाण 87 नांदेड दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अनुराधा ढालकरी 86 नांदेड उत्‍तरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.
 

Web Title: 18 polling stations changed in Nanded taluka; The clutter of voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.