'Savita Damodar Paranjpe' become superhit | ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती
‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

ठळक मुद्देजॉन अब्राहमची पहिली मराठी चित्रपट निर्मिती ‘सविता दामोदर परांजपे’ सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट मुख्य भूमिकेत

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. बऱ्याच दिवसांनंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकांनी व्यक्त केला.

८० चे दशक गाजविलेले ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक, चित्रपट रुपात पहाण्याची उत्सुकता अनेकांना होती. हे माध्यमांतर उत्तम झाल्याचे मान्यवरांचे मत आहे. शुक्रवारी या चित्रपटाने २१ लाख, शनिवारी ३४ लाख तर रविवारी ५२ लाखांची कमाई केली. एकूण या तीन दिवसांत चित्रपटाने एक कोटी उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे.
अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे तृप्ती तोरडमल मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ती ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या आहे. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते  आहेत. 
‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन आणि संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर, वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचे सुश्राव्य संगीत लाभले आहे. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे. 


Web Title: 'Savita Damodar Paranjpe' become superhit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.