Reena offers "Motivation" through backdoor workout videos | बॅक वर्कआऊटच्या व्हिडीओ मार्फत रीना देते "मोटिव्हेशन"

सध्या सर्वांनाच फिट राहायला आवडतं; फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर फिट राहणे हे ओघाने आलेच त्यामुळे कलाकार "डाएट डे प्लॅन" बनवतात.मराठी सिनेसृष्टीदेखील कलाकार आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.अनेक कलाकार सोशल मीडियावर आपल्या फॅन्स ना डाएट आणि जिम बद्दल योग्य ते मार्गदर्शन करताना दिसतात.आपल्या फॅन्सना प्रत्येक गोष्टीची अपडेट्स देण्यासाठी नेहमीच आपल्या सोशल मीडिया वर 'अक्टिव्ह' राहत असतात,कधी एखादी पोस्ट शेयर करत तर कधी 'लाईव्ह' येऊन त्यांच्या फॅन्सना त्यांच्या "डे- टुडे" गोष्टीबद्दल माहिती देत असतात. मराठी सिनेजगात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री रीना अगरवाल अशाच प्रकारे आपल्या सोशल मीडियावर फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत फिटनेसच्या टीप्स देत असते.आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे "सोमवारी" ती "मंडे मोटिव्हेशन" या हॅशटॅग अंतर्गत ती आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत मोटीव्हेट करत असते.मग ते खाण्या-पिण्याच्या सवयी असो किंवा व्यायामच्या टिप्स ! आपल्या सोशल मीडिया वर प्रत्येक सोमवारी रीना "मंडे मोटिव्हेशन" म्हणत काही ना काही पोस्ट करताना दिसते.सोशल मीडियावर सध्या तिने एक व्हिडियो शेयर केला आहे त्यामध्ये ती जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे .या व्हिडीओ मध्ये रीना आपले बायसेप्स दाखवताना दिसत आहे , या व्हिडीओ ला लोकांची पसंतीदेखील मिळताना दिसत आहे . "आपले शरीर हे आपल्या जीवनशैलीचे प्रतिबिंब असते" असे म्हणत रीनाने हि पोस्ट शेयर केली आहे .निरोगी आणि सृदृढ आयुष्य ठेवण्यासाठी नियमितपणे व्यामाम करावा, परंतु अतिरिक्त डाएट आणि न झेपणारा व्यायामसुद्धा आपल्या जीवावर बेतू शकतो असे अभिनेत्री रीना अगरवाल हिचे म्हणणे आहे . 
 

टेलिव्हिजन मालिकांमधून आपल्या करियर ची सुरुवात करणारी रीना हिला नेहमीच दमदार अश्या भूमिका मिळत आल्या मग तो क्या मस्त है लाईफ मधील टीया असो , वा एजन्ट राघव मधील डॉक्टर आरती ची भूमिका असो ; प्रत्येक पैलू मध्ये रीना अतिशय वेगळीच दिसत आली आहे. रीनाने बॉलिवूड प्रमाणेच मराठी चित्रपट केलेले आहे , मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान"च्या  तलाश पासून मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच " सोनाली कुलकर्णी "च्या अजिंठा ह्या चित्रपटांमध्ये रिना ला अभिनयाची संधी मिळाली, यासोबतच बहन होगी तेरी या चित्रपटात देखील रिनाची महत्वाची भूमिका होती. येणाऱ्या वर्षी अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मयुरी देशमुख यांच्यासोबत एका आगामी चित्रपटात रीना प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या चित्रपटात रीनाची नेमकी कशी भूमिका असेल यावर सर्वांचे लक्ष आहे.
Web Title: Reena offers "Motivation" through backdoor workout videos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.