Did you see the old photo of Siddharth Chandekar and Amey Wagh? | ​सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांचा जुना फोटो पाहिला का?

सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी आज मराठी चित्रपटसृष्टीत त्यांची आज वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी दोघांनीही छोट्या पडद्यापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांना अग्निहोत्र या मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेत त्याने साकारलेल्या नील या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेनंतर तो अनेक मालिका आणि चित्रपटात झळकला. एवढेच नव्हे तर त्याने हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. त्याचा गुलाबजाम हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाच्या प्रमोशनात तो सध्या व्यग्र आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसोबत तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
अमेयने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर अमेय मोठ्या पडद्याकडे वळला. अमेयने मुरांबा, फास्टर फेणे यांसारख्या चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. या दोघांनीही छोट्या पडद्यापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली असेच आजवर सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी दोघांनी एका चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. ही गोष्ट सिद्धार्थनेच सोशल मीडियाच्या द्वारे त्याच्या फॅन्सना सांगितली आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला दहा-बारा वर्षांचा सिद्धार्थ पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत या फोटोत छोटासा अमेय देखील आहे. तो देखील त्याच्याच वयाचा आहे. तसेच या फोटोत मकरंद अनासपुरे आणि सुबोध भावे देखील आपल्याला दिसत आहे. या फोटोसोबत सिद्धार्थने एक कॅप्शन लिहिली आहे. या कॅप्शनमधूनच सिद्धार्थ आणि अमेयने बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली हे आपल्याला कळत आहे. या कॅप्शनमध्ये सिद्धार्थने म्हटले आहे की, माझी आणि अमेयची पहिली फिल्म. मी छोटा सुबोध भावे तर अम्या छोटा मकरंद अनासपुरे...१५ वर्ष जुना फोटो. कधीच विसरणार नाही हे...
सिद्धार्थने फोटो शेअर केला असला तरी तो कोणत्या चित्रपटातील आहे हे त्याने त्या कॅप्शनमध्ये म्हटलेले नाही. त्यामुळे हा चित्रपट कोणता असावा याचा अंदाज सिद्धार्थ आणि अमेयचे फॅन्स लावत आहेत. 

Also Read : 'गुलाबजाम'चा टीझर प्रदर्शित,या अंदाजात दिसले सोनाली कुलकर्णी-सिद्धार्थ चांदेकर
Web Title: Did you see the old photo of Siddharth Chandekar and Amey Wagh?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.