तुमची लाडकी ‘अप्सरा’ सध्या काय करत आहे?,सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंमधून मिळतील सगळी उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 12:05 PM2018-08-06T12:05:56+5:302018-08-06T12:07:32+5:30

हेरिटेज दर्जा प्राप्त व्हिटोरिया शहरातील क्लेरिगोस टॉवरसमोर ती फोटोसेशन करते तर कधी पोर्टोमधील ट्रॅममध्ये प्रवासाचा आनंद लुटताना ती दिसते.

Did you know your favourite Apsara nowadays where and what she is doing? Sonali Kulkarni’s this photos will give answer to your questions | तुमची लाडकी ‘अप्सरा’ सध्या काय करत आहे?,सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंमधून मिळतील सगळी उत्तरं

तुमची लाडकी ‘अप्सरा’ सध्या काय करत आहे?,सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंमधून मिळतील सगळी उत्तरं

googlenewsNext

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या कुठे आहे?, ती सध्या काय करते असे अनेक प्रश्न सध्या तिच्या फॅन्सना सतावत आहेत. कारण सध्या सोनाली कोणत्याही सिनेमात झळकलेली नाही.तसंच तिच्या कोणत्या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरु असल्याचीही चर्चा नाही.त्यामुळे नेमकं सोनालीचं सध्या काय सुरु आहे असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडणं साहजिकच आहे. मात्र तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोनालीच्या सोशल मीडिया अकाउंटवर मिळतील. कारण सोनाली सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असते. ती सध्या काय करते आणि कुठे आहे याची उत्तरं इथेच मिळतील. 

सोनाली सध्या परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पोर्तुगाल या शहरात सोनाली सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. या शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांना सोनाली भेट देत आहे.पोर्तुगालमधील प्रत्येक क्षण सोनाली कॅमेऱ्यात कैद करत आहे. हेरिटेज दर्जा प्राप्त व्हिटोरिया शहरातील क्लेरिगोस टॉवरसमोर ती फोटोसेशन करते तर कधी पोर्टोमधील ट्रॅममध्ये प्रवासाचा आनंद लुटताना ती दिसते. इतकंच नाही सुंदर अशा पोर्टो शहरात स्वतःला फिट ठेवण्याचाही ती प्रयत्न करते. या शहरात सायकलिंगचा आनंद घेतानाही सोनालीचा आनंद ओसंडून वाहतो आहे. इथल्या प्रसिद्ध फुटबॉल स्टेडिअमचीही तिने सैर केली. हे सगळे फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.तिच्या या प्रत्येक फोटोवर फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसंच लाइक्सचा वर्षाव होत आहे. 

नुकतंच सोनालीने एक खास फोटोशूटही केले आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनालीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. लाल रंगाच्या ड्रेसिंगमध्ये सोनालीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज दिसून येत आहे. सोनालीच्या या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. समुद्र किनाऱ्यावर झालेल्या या फोटोशूटमध्ये सोनालीचं सौंदर्य आणि अद्भुत निसर्गाचा नजारा असा मिलाफ पाहायला मिळत आहे.तेजस नेरुरकरने सोनालीचे हे फोटोशूट केले असून विनोद सरोदेने तिचा मेकअप केला आहे. दुबईत हे फोटोशूट करण्यात आल्याचं समजतंय. 

Web Title: Did you know your favourite Apsara nowadays where and what she is doing? Sonali Kulkarni’s this photos will give answer to your questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.