कवी इज बॅक...'त्या' दोघांनी वाद मिटवले, कारण त्यांच्यामध्ये होते आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:08 PM2019-04-09T12:08:17+5:302019-04-09T12:32:52+5:30

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण रक्त आटवल्याचे सांगत आपल्या भाषणात धम्माल उडवून दिल्ली.

lok sabha 2019 : ramdas athawale speech in ausa, bjp-shiv sena rally narendra modi with uddhav thackeray | कवी इज बॅक...'त्या' दोघांनी वाद मिटवले, कारण त्यांच्यामध्ये होते आठवले

कवी इज बॅक...'त्या' दोघांनी वाद मिटवले, कारण त्यांच्यामध्ये होते आठवले

Next

औसा : शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महायुतीची सभा सुरु आहे. या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून विरोधकांना चिमटे काढले. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण रक्त आटवल्याचे सांगत आपल्या भाषणात धम्माल उडवून दिल्ली.

रामदास आठवले म्हणाले,  
 "येरे येरे पावसा मतांच्या पावसा
शृंगारेंना निडणून देणार आहे लातूरचं औसा
म्हणूनच पाहूत शृंगारेेंच्या नौसा
आणि ओमराजेंना निवडून आण्यासाठी
येरे येरे लवकर पावसा
आज या ठिकाणी आपली महायुतीची अत्यंत प्रचंड अशापद्धतीची सभा
भीम शक्तीची सभा
भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आणि रासप आणि आमच्या महायुतीची जाहीर सभा
तुम्हाला मी दिली आहे फार मोठी मुभा
म्हणूनच नरेंद्र मोदींची एवढी मोठी या ठिकाणी सभा
आज याठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा आले आहेत
म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपले वाद मिटवले
कारण, त्यांच्यामध्ये होते रामदास आठवले
अरे तुम्हाला एकत्र आण्यासाठी मी माझं रक्त आटवले
म्हणून शृंगारे आणि रामराजेंना पार्लमेंटमध्ये पाठवले
आम्ही लोकांच्यासाठी काम करणारे लोक 
फक्त आरोप करणारी आमची भूमिका नाही
विरोधकांनी जे काय करावं, पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आहोत.
 बाबासाहेब आंबेडरांनी ज्या संविधानतला भारत उभारण्याचा आमचा सरकार प्रयत्न आहे
एनडीएचं सरकार आहे, ते भूल थाफा देणारं नाही..."

दरम्यान, औसा येथे उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. यावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. 
 

Web Title: lok sabha 2019 : ramdas athawale speech in ausa, bjp-shiv sena rally narendra modi with uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.