आमच्या मित्रांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्यात; संजय मंडलिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका

By समीर देशपांडे | Published: April 9, 2024 03:17 PM2024-04-09T15:17:23+5:302024-04-09T15:19:04+5:30

'वेगवेगळी दुकाने सुरू राहिली की त्यामध्ये त्यांचे फावते'

Our friends wanted to remove the branches of Ajinkyatara; Sanjay Mandlik criticizes Satej Patil | आमच्या मित्रांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्यात; संजय मंडलिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका

आमच्या मित्रांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्यात; संजय मंडलिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका

कोल्हापूर: ज्यांना मी कालपर्यंत चांगला वाटत होतो, पुरोगामी वाटत होतो त्यांना मी एका रात्रीत वाईट, प्रतिगामी वाटायला लागलो. निवडणुकीनंतर प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करणार असे म्हणणाऱ्या आमच्या मित्रांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्या आहेत का मंडलिक यांच्या कोल्हापूर शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी मंडलिक बोलत होते.

मंडलिक म्हणाले, जगात भारताची मान उंचावणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसली आहे. लोकसभेमध्ये जाण्याचा कोणाचा राजाहट्ट असेल तर तो पुरवण्यासाठी कोल्हापूरची जनता नाही तर विकासासाठी जनता मतदान करणार आहे. 

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील काही जणांना फुटीचे राजकारण आवडते. वेगवेगळी दुकाने सुरू राहिली की त्यामध्ये त्यांचे फावते. परंतु या सगळ्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार मंडलिक यांना विजयी करावे असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, एकमेकांवर वैयक्तिक टीका टिपणी करण्यापेक्षा विकासाच्या भूमिकेचा, विचारावर आधारित प्रचार व्हावा. यावेळी खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, गायत्री राऊत, राहुल चिकोडे, उत्तम कांबळे यांची भाषणे झाली.

Web Title: Our friends wanted to remove the branches of Ajinkyatara; Sanjay Mandlik criticizes Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.