लेखापरीक्षकांची आॅडीट फीसाठीची तडजोड दुर्देवी : अरुण काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 05:03 PM2019-03-12T17:03:38+5:302019-03-12T17:04:46+5:30

कोल्हापूर : कमी रकमेत लेखापरीक्षण करुन देण्यात कांही लेखापरीक्षक आघाडीवर आहेत, पण त्यामुळे कामाचा दर्जाही खालावत चालला आहे आणि ...

Auditor's audit fee compromise: Arun Kakade | लेखापरीक्षकांची आॅडीट फीसाठीची तडजोड दुर्देवी : अरुण काकडे

लेखापरीक्षकांची आॅडीट फीसाठीची तडजोड दुर्देवी : अरुण काकडे

Next
ठळक मुद्देलेखापरीक्षकांची आॅडीट फीसाठीची तडजोड दुर्देवी : अरुण काकडे लेखापरीक्षकांच्या बैठकीत टोचले कान

कोल्हापूर: कमी रकमेत लेखापरीक्षण करुन देण्यात कांही लेखापरीक्षक आघाडीवर आहेत, पण त्यामुळे कामाचा दर्जाही खालावत चालला आहे आणि शासनाचा महसूलही बुडत आहे. विशेषता नव्यानेच या क्षेत्रात आलेलेच अशी पाउले उचलताना दिसत आहेत. आॅडीटसाठी अशाप्रकारे तडजोड करणे दुर्देवी आहे, अशा शब्दात जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी लेखापरीक्षकांचे कान उपटले. आता लोकही सजग झाले आहेत, त्यामुळे येथून पुढे तरी जबाबदारीचे भान ठेवूनच काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

जिल्हा प्रमाणित लेखापरीक्षक असोसिएशनचा मेळावा मंगळवारी दुपारी शाहू मिनी सभागृहात झाला. अटल पणन योजनेत पुरस्कार मिळाल्याबद्दल असोसिएनतर्फे उपनिबंधक अरुण काकडे यांचा सत्कार झाला. निवृत्त उपनिबंधक दिनेश ओउळकर, सहनिबंधक गजेंद्र देशमुख, असोसिएशनचे माने, भोसले प्रमुख उपस्थित होते.

लेखापरीक्षकांना आपल्या खास शैलीत सुनावताना अरुण काकडे म्हणाले. जुन्या लोकांना यातील खाचाखोचा माहित आहेत, पण अलीकडे नव्याने या क्षेत्रात आलेले वाटेल तशा तडजोडी करताना धन्यता मानत आहे. शासनाच्या प्रमाणित फी ८0 हजार असताना त्याऐवजी ३0 हजार घेउन कामांचा उरक केला जात आहे. सहकारातील गुणवत्तेला हे मारक आहे. असे प्रकार करुन फौजदारीसारख्या नसत्या फेऱ्यात अडकू नका.

दोष दुरुस्ती अहवाल तात्काळ करुन घ्या. करत आहोत असे म्हणण्यापेक्षा समजून घेउन ते करण्यावर भर द्या. आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूका असल्याने त्याआधीच ही सर्व कामे पूर्ण करण्यावर भर द्या. अपहार आहे त्या ठिकाणी कठोर व्हा. संस्थाचालकांना विश्वासात घेउन काम करा. तुमच्या एका चुकीमुळे कुणी निवडणूकीसाठी अपात्र ठरु नये याची आतापासूनच दक्षता घ्यावी, असेही ककडे यांनी सांगितले.

निवृत्त उपनिबंधक दिनेश ओउळकर म्हणाले, लेखापरीक्षक हे सहकार चळवळीत मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. महाराष्ट्रातील सहकार चळवळ व कायदे देशात प्र्रगत मानले जातात. आपले अनुकरण इतर राज्ये करतात. सहकाराचा गाभा लोकशाही आहे, ती टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
 

 

Web Title: Auditor's audit fee compromise: Arun Kakade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.