गोव्यात ९ ते ११ दरम्यान सर्वाधिक मतदान

By वासुदेव.पागी | Published: May 7, 2024 05:32 PM2024-05-07T17:32:57+5:302024-05-07T17:35:18+5:30

Goa lok sabha election 2024 : उत्तर गोव्यात प्रत्येक टप्प्यात साखळी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले होते.

Goa lok sabha election 2024 Highest polling in Goa between 9 and 11 | गोव्यात ९ ते ११ दरम्यान सर्वाधिक मतदान

गोव्यात ९ ते ११ दरम्यान सर्वाधिक मतदान

पणजी - मतदानाच्या दिवशी रणरणते ऊन आणि असह्य उकाडा असणार याची माहिती असल्यामुळे मतदारांनी सूर्य माथ्यावर येण्यापूर्वीच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ९ ते ११ या दरम्यान जवळ जवळ ३० टक्के मतदान झाले होते. १ वाजेपर्यंत निम्या मतदारांनी आपला हक्क बजावला होता. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सीयसपर्यंत तापणार होते. त्यामुळे सकाळीच लोक मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा होती. परंतु सकाळी ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान १३ टक्केच मतदान झाले होते. त्यानंतर ९ ते ११ वाजण्याच्या सुमारास  अंदाजे २० टक्के मतदान होऊन एकूण एकूण मतदान ३० टक्क्यांपेक्षा वर गेले होते तर ३ वाजपर्यंत एकूण मतदान ६० टक्के झाले होते. दक्षीण गोव्यात आणि उत्तर गोव्यात असेच चित्र होते.

उत्तर गोव्यात प्रत्येक टप्प्यात साखळी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले होते. ९ ते ११ या वेळेत १७ टक्के,  ११ पर्यंत ३९ टक्के, १ पर्यंत ५४.४३ टक्के आणि ३ पर्यंत ७०.६६ टक्के इतके मतदान झाले होते. दक्षीण गोव्यात सकाळी ७ ते ९ पर्यंत सर्वाधीक मतदान कुडचडे विधानसभा मतदारसंघात १६.४ टक्के इतके झाले होते. ११ पर्यंत सांगेत ३४.२८ टक्के १ वाजेपर्यंत वाळपईत सर्वाधिक ५५.६६ टक्के मतदान तर ३ वाजेपर्यंत सांगे मतदारसंघात ६८.९६ टक्के मतदान झाले होते.

Web Title: Goa lok sabha election 2024 Highest polling in Goa between 9 and 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.