दबंग 3 मध्ये सलमानसोबत दिसणार काजोल ?

By Admin | Published: October 25, 2016 08:33 PM2016-10-25T20:33:14+5:302016-10-25T21:04:16+5:30

एकाहून एक हिट चित्रपट देणारा अभिनेता सलमान खान याचा 'दबंग 3' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Will Kajol appear with Salman in Dabangg 3? | दबंग 3 मध्ये सलमानसोबत दिसणार काजोल ?

दबंग 3 मध्ये सलमानसोबत दिसणार काजोल ?

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - एकाहून एक हिट चित्रपट देणारा अभिनेता सलमान खान याचा 'दबंग 3' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मासिकनं दिलेल्या माहितीनुसार आगामी 'दबंग-३' चित्रपटामध्ये सलमानसोबत काजोल मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अरबाज खान प्रोडक्शन कंपनी, सलमान खान किंवा काजोल यांच्याकडून आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. 'दबंग-३' चित्रपटामध्ये सलमानसोबत काम करण्यास काजोल तयार झाल्यास ही जोडी तिसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर दिसू शकते. यापूर्वी सलमान खान आणि काजोलने ' प्यार किया तो डरना क्या ' आणि ' कुछ कुछ होता है ' मध्ये एकत्रित काम केले आहे. यापूर्वी 'दबंग-३' मध्ये सोनाक्षी सिन्हाची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती. मात्र आता तिच्या जागी एखादी नवी हिरोईन सलमान शोधत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

(परिणीती म्हणतेय, मी दबंग 3 मध्ये नाहीये)

सलमान खानच्या दबंग, दबंग 2 या चित्रपटांच्या यशानंतर दबंग 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. दबंगच्या पहिल्या आणि दुस-या भागात सोनाक्षी सिन्हा सलमानसोबत झळकली होती. त्या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती. आता सलमानसोबत पुन्हा काजोल दिसल्यास प्रेक्षकांना ही जोडी रुपेरी पडद्यावर किती आवडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Will Kajol appear with Salman in Dabangg 3?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.