भर कार्यक्रमात वरुण धवनची फाटली पँट

By Admin | Published: March 4, 2017 10:43 AM2017-03-04T10:43:51+5:302017-03-04T10:53:49+5:30

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन रिअॅलिटी शो 'इंडियन आयडल'च्या मंचावर आला असताना त्याला लाजिरवण्या परिस्थितीचा सामना करावा लागला

Varun Dhawan's trapped foot punch in the program | भर कार्यक्रमात वरुण धवनची फाटली पँट

भर कार्यक्रमात वरुण धवनची फाटली पँट

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - अभिनेता वरुण धवन सध्या आपला आगामी चित्रपट 'बद्रिनाथ की दुल्हनिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन रिअॅलिटी शो 'इंडियन आयडल'च्या मंचावर आला असताना त्याला लाजिरवण्या परिस्थितीचा सामना करावा लागला. बरं परिस्थिती अशी होती की हसावं का रडावं हेच वरुणला कळेनासं झालं होतं. 
 
'इंडियन आयडल'मध्ये हजेरी लावलेल्या वरुण धवनला स्पर्धक माल्विकाने स्टेजवर येऊन डान्स करण्याची विनंती केली. बिनधास्तपणे वावरणा-या वरुण धवनने यासाठी लगेच होकार दिला. पण येथेच सगळं गणित फसलं, कारण वरुन धवनने एकदम टाईट पँट घातली होती. 
जेव्हा वरुणने स्पर्धक माल्विकाला एका पुरुषामध्ये काय पाहतेस ? असं विचारलं तेव्हा तिने सांगितलं की, 'तो शाहरुख खानसारखा रोमॅन्टिक असला पाहिजे आणि त्याला चेन्नईचा कुथू डान्स आला पाहिजे. वरुणने याआधी हा डान्स प्रकार कधीच केला नव्हता, त्यामुळे त्याने माल्विकाची सोबत मागितली. वरुण स्टेजवर डान्स करत होता तितक्यात त्याची पँट फाटली. परिस्थिती लाजिरवाणी झाली असली तरी वरुणने मात्र ती सांभाळून घेतली. 
वरुणने जोरजोरात हसायला सुरुवात केली आणि लपवण्यासाठी कोपरा शोधू लागला. सूत्रसंचालक करण वाहीने वरुणचा बचाव करत त्याला आपल्या खांद्यावर बसवून खाली नेलं. यानंतर वरुणने व्हॅनिटी वॅनमध्ये जाऊन पँट बदलली आणि पुन्हा कार्यक्रमात सहभागी झाला. 
 

Web Title: Varun Dhawan's trapped foot punch in the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.