जागो मोहन प्यारे हा कार्यक्रम टिआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोणी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:04 AM2018-10-27T11:04:49+5:302018-10-27T11:07:18+5:30

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार जागो मोहन प्यारे ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जागो मोहन प्यारे या मालिकेने कित्येक महिन्यानंतर पहिल्या पाचमध्ये आपली जागा निर्माण केली आहे.

Zee Marathi Mazhya Navryachi Bayko tops in marathi serial as per Broadcast Audience Research Council | जागो मोहन प्यारे हा कार्यक्रम टिआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोणी मारली बाजी

जागो मोहन प्यारे हा कार्यक्रम टिआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोणी मारली बाजी

googlenewsNext

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार जागो मोहन प्यारे ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जागो मोहन प्यारे या मालिकेने कित्येक महिन्यानंतर पहिल्या पाचमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. या मालिकेत अतुल परचुरे, श्रुती मराठे आणि सुप्रिया पाठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. पण आता तिने या मालिकेला रामराम ठोकला असून तिची जागा इशा केसकरने घेतली आहे. रसिकाने मालिका सोडल्यानंतर त्याचा या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होईल असे सगळ्यांना वाटले होते. पण रसिकाच्या एक्झिटनंतरही ही मालिका प्रेक्षकांच्या सगळ्यात पसंतीची मालिका आहे. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. 

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या क्रमांकावर सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची तुला पाहते रे ही मालिका आहे. या मालिकेतील सुबोध आणि गायत्रीच्या केमिस्ट्रीची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आणि त्यांच्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे.  राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. चला हवा येऊ द्या ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून पहिल्या पाच मध्ये होती. पण यंदाच्या आठवड्यात या मालिकेला आपले स्थान टिकवता आलेले नाही. विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत. 
 

Web Title: Zee Marathi Mazhya Navryachi Bayko tops in marathi serial as per Broadcast Audience Research Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.